नाट्यनिर्माता संघाचे अध्यक्ष प्रसाद कांबळीच : मोहन जोशी

टीम इ सकाळ
बुधवार, 28 जून 2017

नाट्य निर्माता संघ ही नाट्यपरिषदेची घटक संस्था आहे. नाट्य निर्माता संघाचे अध्यक्ष हे प्रसाद कांबळीच असून नाट्यपरिषदेचा त्यांनाच पाठींबा असेल. गेल्या वर्षीपर्यंत या निर्मात्यांना प्रसाद कांबळी निर्माता म्हणून चालले. अनेक कागदपत्रांवर त्यांच्या सह्याही आहेत. आता निवडणूक झाल्यावर मात्र सोयीस्कर प्रसाद हे निर्माते नसल्याचा दावा केला जातो. हे खेदजनक असून नाट्य परिषदेसाठी कांबळीच अध्यक्ष आहेत, असे थेट स्पष्टीकरण परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी दिले.

पुणे: नाट्य निर्माता संघ ही नाट्यपरिषदेची घटक संस्था आहे. नाट्य निर्माता संघाचे अध्यक्ष हे प्रसाद कांबळीच असून नाट्यपरिषदेचा त्यांनाच पाठींबा असेल. गेल्या वर्षीपर्यंत या निर्मात्यांना प्रसाद कांबळी निर्माता म्हणून चालले. अनेक कागदपत्रांवर त्यांच्या सह्याही आहेत. आता निवडणूक झाल्यावर मात्र सोयीस्कर प्रसाद हे निर्माते नसल्याचा दावा केला जातो. हे खेदजनक असून नाट्य परिषदेसाठी कांबळीच अध्यक्ष आहेत, असे थेट स्पष्टीकरण परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी दिले. 

गेल्या वर्षी प्रशांत दामले व संचालक मंडळाने राजीनामे दिल्यानंतर नाट्य निर्माता संघाची निवडणूक पार पडली होती. त्यात प्रसाद कांबळी यांच्यासह सुनील वर्वे, संतोष काणेकर, दिनेश पेडणेकर, श्रीकांत तटकरे, राकेश सारंग आदी मंडळी निवडून आली होती. त्यानंतर बहुमताने प्रसाद कांबळी यांना अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. यावेळी काही निर्मात्यांनी कांबळी हे निर्माता संघाचे सदस्य नसून त्यांच्या मातोश्री कविता कांबळी यांच्या नावे सदस्यत्व असल्याचा दावा केला होता. म्हणूनच प्रशांत दामले यांच्या नेतृ्त्वाखाली असलेल्या माजी सदस्यांनी करावयाचे असलेले दफ्तर हस्तांतरण केले नाही. दामले यांना मानणारा वर्ग कांबळी यांना अध्यक्ष मानायला तयार नसल्याचे चित्र सध्या आहे. त्यापार्श्व भूमीवर नाट्यपरिषदेचे अध्यक्ष असलेल्या मोहन जोशी यांच स्पष्टीकरण अत्यंत महत्वाचे मानले जाते. जोशी म्हणाले, कालपर्यंत तुम्हाला प्रसाद कांबळी चालत होते. आता अचानक काहीतरी मुद्दा काढून त्यांचे सदस्यत्व नाकारणे याला अर्थ नाही. नाट्यपरिषदेचा कांबळी यांनाच पाठिंबा असून, तेच अध्यक्ष असल्याचे आम्ही मानतो.