भिकारी या चित्रपटाचे रणवीर सिंगने केले पोस्टर लाॅंच

टीम ई सकाळ
मंगळवार, 13 जून 2017

हिंदी इंडस्ट्रीचे मास्टरजी गणेश आचार्य यांचा नवा सिनेमा भिकारी आता चांगलाच चर्चेत आला आहे. कारण या सिनेमाचे पहिले टीजर पोस्टर बाॅलिवूड अभिनेता रणवीर सिंग याने ट्विट करून प्रकाशित केले. 

मुंबई : हिंदी इंडस्ट्रीचे मास्टरजी गणेश आचार्य यांचा नवा सिनेमा भिकारी आता चांगलाच चर्चेत आला आहे. कारण या सिनेमाचे पहिले टीजर पोस्टर बाॅलिवूड अभिनेता रणवीर सिंग याने ट्विट करून प्रकाशित केले. 

भिकारी हा गणेश आचार्य यांचा पहिलाच सिनेमा असून यात स्वप्नील जोशी यांची मुख्य भूमिका आहे. या पोस्टरमध्ये एका छत्रीच्या आडोशाला एक इसम पहुडलेला दिसत असून तो वर वर भिकारी वाटत असला तरी त्याच्या हातातील घड्याळ पाहता हा इसम कोणी भिकारी नसणार असे वाटते. शिवाय तो पहुडला असला तरी त्याच्या शेजारी कटोराही दिसतो. एकूणात या पोस्टरवरून फार काही लक्षात येत नसले, तरी ते उत्सुकता वाढवते हे नक्की.