...तर पत्रकार झाले असते! : मृणाल दुसानिस (रॅपिड फायर)

चिन्मयी खरे 
शनिवार, 17 जून 2017

"अस्सं सासर सुरेख बाई' या कलर्स मराठीवरील मालिकेत सध्या नवं वळण आलं आहे. प्रेक्षकांच्या या आवडत्या मालिकेतील आवडती व्यक्तिरेखा अर्थातच मुन्नू (जुई). ही भूमिका करणाऱ्या मृणाल दुसानिससोबत रंगलेलं हे रॅपिड फायर... 

कशी आहे मृणाल? 
- मी गोड आहे. (हसून) 

"अस्सं सासर सुरेख बाई' या कलर्स मराठीवरील मालिकेत सध्या नवं वळण आलं आहे. प्रेक्षकांच्या या आवडत्या मालिकेतील आवडती व्यक्तिरेखा अर्थातच मुन्नू (जुई). ही भूमिका करणाऱ्या मृणाल दुसानिससोबत रंगलेलं हे रॅपिड फायर... 

कशी आहे मृणाल? 
- मी गोड आहे. (हसून) 

मालिकेतील मुन्नू आणि मृणाल सारख्याच की वेगवेगळ्या? 
- मी आतापर्यंत केलेल्या सगळ्या भूमिका या थोड्याफार प्रमाणात सारख्याच होत्या; पण मुन्नू आणि मृणालमध्ये खूप फरक आहे. 

आवडता सहकलाकार? 
- आतापर्यंत ज्यांच्याबरोबर काम केले आहे ते सगळेच. 

 भविष्यात कोणाबरोबर काम करायला आवडेल? 
- अभिजित खांडकेकरबरोबर पुन्हा काम करायला आवडेल. 

 अभिनेत्री झाली नसतीस तर? 
- मी पत्रकार झाले असते. 

फिरायला जायची आवडती जागा? 
- माझं सासर. कारण लग्नाला दीड वर्ष झालं तरी अजूनही मी पूर्णपणे तिथे रुळले नाहीय. 

 कुटुंबाबरोबर घालवलेला अनमोल क्षण? 
- गणेशोत्सवासाठी माझा नवरा नीरज भारतात आला होता, ते दिवस माझ्या आयुष्यातील सगळ्यात अनमोल दिवस होते. 

 मृणाल आणि मुन्नूमध्ये काय साम्य आहे? 
- दोघींचंही बाबांवर आणि नवऱ्यावर खूप प्रेम आहे. 

 मॉडर्न भूमिका करायला आवडतात की सोज्वळ? 
- मला आता अजिबातच सोज्वळ भूमिका करायच्या नाहीयेत. मला आता स्वत:वर प्रयोग करायला आवडेल. काहीतरी वेगळं करून बघेन. 

नकारात्मक भूमिका करावीशी वाटली तर कुठली करशील? 
- मला असं पटकन नाही सांगता येणार; पण "अस्सं सासर...'मधील विभाची भूमिका करायला आवडली असती.