मराठी मालिकांतील देश-विदेश 

वृत्तसंस्था
शनिवार, 25 मार्च 2017

हिंदी चित्रपट परदेशात केव्हाच पोहोचले; पण मराठी मालिका तसेच चित्रपटांना महाराष्ट्राबाहेर यायला तसा बराच वेळ लागला. हळूहळू मराठी मालिकांनीही महाराष्ट्राबाहेर जाऊन काही भागांसाठी का होईना चित्रीकरण करायला सुरुवात केली. ही पहिली झेप घेतली ती झी मराठीवरील "तुझं माझं जमेना' या मालिकेने. पहिल्यांदा एका मराठी मालिकेचे भारताबाहेर शूटिंग झाले. त्यानंतर ती थंड हवा अनेक मालिकांना लागली आणि कलर्स मराठीवरील "माझे मन तुझे झाले' मालिकेतील कलाकार काश्‍मीरमध्ये जाऊन पोहोचले; तर सरस्वती मालिकेतील जोडी पोहोचली दुबईत.

हिंदी चित्रपट परदेशात केव्हाच पोहोचले; पण मराठी मालिका तसेच चित्रपटांना महाराष्ट्राबाहेर यायला तसा बराच वेळ लागला. हळूहळू मराठी मालिकांनीही महाराष्ट्राबाहेर जाऊन काही भागांसाठी का होईना चित्रीकरण करायला सुरुवात केली. ही पहिली झेप घेतली ती झी मराठीवरील "तुझं माझं जमेना' या मालिकेने. पहिल्यांदा एका मराठी मालिकेचे भारताबाहेर शूटिंग झाले. त्यानंतर ती थंड हवा अनेक मालिकांना लागली आणि कलर्स मराठीवरील "माझे मन तुझे झाले' मालिकेतील कलाकार काश्‍मीरमध्ये जाऊन पोहोचले; तर सरस्वती मालिकेतील जोडी पोहोचली दुबईत. झी मराठीवरील सगळ्यांचे लाडके शिव आणि गौरी आपला हनिमून स्वीत्झर्लंडमध्ये साजरा करून आले आणि आता "नकुशी' या मालिकेतील नकुशी आणि रणजितचे प्रेम मनालीत फुलणार आहे. मराठी मालिकांचा हा भटकंतीचा सिलसिला असाच सुरू राहू दे आणि घरबसल्या लोकांना जगभराचे दर्शन घडू दे, अशाच शुभेच्छा आपल्या मराठी मालिकांना देऊयात. 

Web Title: nakushi marathi serial shoot in manali