नंदिनी-अंजली झाल्या 'संगीत सम्राट'च्या विजेत्या

टीम ई सकाळ
मंगळवार, 8 ऑगस्ट 2017

मुंबई:संगीत सम्राट' या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा वाशीयेथील विष्णुदास भावे सभागृहात पार पडला. महाराष्ट्राच्या पहिल्या संगीत सम्राट बनण्याचा मान, अहमदनगरमधील 'नंदिनी अंगद गायकवाड आणि अंजली अंगद गायकवाड' या दोन सख्ख्या बहिणींना मिळाला. 

मुंबई:संगीत सम्राट' या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा वाशीयेथील विष्णुदास भावे सभागृहात पार पडला. महाराष्ट्राच्या पहिल्या संगीत सम्राट बनण्याचा मान, अहमदनगरमधील 'नंदिनी अंगद गायकवाड आणि अंजली अंगद गायकवाड' या दोन सख्ख्या बहिणींना मिळाला. 
या दोन्ही बहिणींनी सुरुवाती पासून उत्तोमोत्तम सादरीकरण करत दोन्ही परीक्षक आदर्श शिंदे आणि क्रांती रेडकरयांच्या आणि प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. त्यांच्या पहिल्या सादरीकरणाला आदर्श आणि क्रांती या दोघांनीहीउभे राहून कौतुक केले होते. जस जसा कार्यक्रम अंतिम सोहळ्याकडे वाटचाल करू लागला तसतसे 'नंदिनी अंजली' यांचा संगीत सम्राट बनण्याचा दावा बळकट होऊ लागला होता. महा अंतिम सोहळ्यासाठी सुद्धा त्यांनी जय्यततयारी केली होती.  शात्रीय संगीताचा वारसा  लाभलेल्या या बहिणींनी निरनिराळे परफॉर्मन्सच्या आधारे आपलेसांगीतिक क्षेत्रातील अष्टपैलुत्व दाखवुन दिले. महा अंतिम सोहळ्यात या दोन्ही बहिणींनी सुधीर फडके यांची गाणी, बहारदार आणि तेवढ्याच निरागस पद्धतीने स्वरबद्ध करीत परीक्षकांना आणि प्रेक्षकांना एक वेगळी अनुभूती दिली. महाअंतिम सोहळ्याला  इतर स्पर्धकांनी सुद्धा चांगले प्रदर्शन केले. मात्र परीक्षकांना शेवटी ८ मधून केवळ ३स्पर्धक निवडायचे होते. आणि त्यातूनही एक संगीत सम्राट निवडायचा होता. सर्वांच्याच अतिशय उत्तमसादरीकरणामुळे परीक्षकांनी बरीच चर्चा करून उत्कृष्ट आणि सर्वोकृष्ट स्पर्धकांची निवड केली. निकप जाहीर करताना परीक्षक सुद्धा एका तणावात होतेच पण स्पर्धक आणि त्यांच्यावर प्रेम करणारा संपूर्ण महार
' या प्रश्नाच्या उत्तरासाठी आतुर झाला होता. आणि शेवटी ती वेळ आली. क्रांती रेडकर यांनी सर्वप्रथम तिसऱ्या क्रमांकाचे नाव जाहीर केले ते होते जेजुरीचा 'प्रथमेश मोरे'. दुसरे नावम्हणजेच मुंबईच्या 'दंगल गर्ल्स' यांचे नाव आदर्श शिंदे जाहीर केले आणि शेवटी महाराष्ट्राच्या पहिल्या 'संगीतसम्राट' चे नाव 'विशेष परीक्षक' म्हणून उपस्थित असलेले मराठी चित्रपट इंडस्ट्रीतील अभिनेते, दिग्दर्शक आणिनिर्माते ‘श्री. सचिन पिळगावकर’ यांनी जाहीर केले आणि ते होते ‘नंदिनी अंजली’

आदर्श आणि क्रांती हे दोघेही महाराष्ट्राच्या पहिल्या 'संगीत सम्राट' झालेल्या 'नंदिनी अंजली ' चे अभिनंदन करताना म्हणाले “महाराष्ट्राचा पहिला 'संगीत सम्राट' निवडणं हे आमच्यासाठी सुद्धा एक मोठे आव्हान होते. पण आम्ही सुद्धा अतिशय निपक्षपातीपाने होऊन, स्पर्धकांचे संगीताच्या सर्व स्तरावर परीक्षण करीत , योग्य स्पर्धक निवडला जाईल असे कटाक्षाने पाहिले. भविष्यकाळात या दोघीही महाराष्ट्रभर संगीताच्या क्षेत्रात नक्कीच नावाजल्या जातील." सचिन पिळगावकर यांनी त्यांची भावना व्यक्त करताना सांगितले, की " या दोन्ही लहान मुली महाराष्ट्राच्याच नव्हे, तर भारताच्या संगीताचे भविष्य आहेत. 'नंदिनी अंजली' या दोघीनींही असेच पुढे जात प्रेक्षकांना त्यांच्या गायनाने सुखद अनुभव द्यावा, अशी ईश्वरचरणी प्रार्थना आहे “. झी युवा आणि झी टॉकीज चे व्यवसाय प्रमुख 'बवेश जानवलेकर' यांनी 'संगीत सम्राट’ च्या महा अंतिम सोहळ्याच्या निमित्ताने सांगितले की, " झी युवाने महाराष्ट्राचा कानाकोपरा पिंजून काढत महाराष्टातील उत्तोमोत्तम कलाकारांना त्यांच्या हक्काचं व्यासपीठ दिले. सर्वसामान्यांमध्ये दडलेला आणि संगीताशी नाळ जोडलेला कलाकार समाजासमोर यावा, यानिमित्ताने आणि कलाकारांसोबत चांगला श्रोता घडावा या हेतूने झी युवा या वाहिनीने 'संगीत सम्राट' या कार्यक्रमाची निर्मिती केली.'नंदिनी अंजली' यांनी त्यांना मिळालेल्या संधीच सोनं केले आणि संगीत सम्राट या कार्यक्रमामुळे, झी युवा या वाहिनेने महाराष्ट्राला दोन उत्तम भावी पार्श्वगायिका दिल्या आहेत.  संगीत सम्राट या कार्यक्रमात फायनल पर्यंत पोहचलेला प्रत्येक स्पर्धक मग तो गायक किंवा वादक असो, त्यांच्या गुणवत्तेला दाद देत, स्पर्धेचा निकाल जाहीर होण्या आधीच मराठी कलाक्षेत्रातून कामाच्या विविध संधी उपलबध झाल्या आहेत."

झी युवा वाहिनीवर रविवार दिनांक ६ ऑगस्टला संध्याकाळी ७ वाजता या लोकप्रिय कार्यक्रमाचे प्रसारण संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले. या कार्यक्रमाला मराठी इंडस्ट्रीतील अनेक मान्यवर लोक उपस्थित होते. परीक्षक आणि प्रेक्षकांच्या साक्षीने, इशिता विश्वकर्मा, मानस गोसावी, संगीत फॅक्टरी, इमोशन्स बँड, प्रथमेश मोरे, रवींद्र खोमणे आणि दंगल गर्ल्स  या ८ ही फाइनलिस्टच्या संगीत सम्राट च्या किताबासाठीचा अंतिम सोहळा दिमाखात रंगला. त्याच प्रमाणे तरुणाईचा लाडका गायक रोहित राऊत आणि अभिनेत्री उर्मिला निंबाळकर यांनी कार्यक्रमातील निवेदनाची भूमिका उत्तम सांभाळली.आजचा आघाडीचा लोकप्रिय अभिनेता अमेय वाघ हा महा अंतिम सोहळ्याचा विशेष निवेदक होता. निवेदनात विविधता आणत स्पर्धक, परीक्षक आणि प्रेक्षक यांचे उत्तमरीत्या मनोरंजन केले. महाराष्ट्राच्या पहिल्या संगीत सम्राटाचे विजेतेपद पटकाविल्यामुळे आता महाराष्ट्रतील संगीतरसिकांच्या कौतुकाच्या या दोन्ही बहिणी धनी झाल्या आहेत.

Web Title: Nandini anjali sangeet samrat winners esakal news