मुंबई: स्टॅच्यू आॅफ लिबर्टी हे नाटक लवकरच रंगमंचावर

टीम ई सकाळ
शनिवार, 27 मे 2017

गोष्ट छोटी डोंगराएवढी, डॅंबीस, गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा या सिनेमांचा. आता अरविंंद नाटकातून आपली दिग्दर्शनाची नवी इनिंग सुरू करतायत. त्यांनीच लिहिलेले आणि दिग्दर्शित केलेले स्टॅच्यू आॅफ लिबर्टी हे नाटक लवकरच रंगमंचावर येत आहे. 

मुंबई: 'चला हवा येऊ द्या' या लोकप्रिय कार्यक्रमातून अरविॆद जगताप हे नाव परिचित आहेच. या शोमध्ये जगताप यांनी लिहिलेली पत्र विषेश गाजली आहेत. आजवर त्यांनी अनेक चित्रपटांचे लेखनही केले आहे. यात आवर्जून उल्लेख करायला हवाा तो, गोष्ट छोटी डोंगराएवढी, डॅंबीस, गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा या सिनेमांचा. आता अरविंंद नाटकातून आपली दिग्दर्शनाची नवी इनिंग सुरू करतायत. त्यांनीच लिहिलेले आणि दिग्दर्शित केलेले स्टॅच्यू आॅफ लिबर्टी हे नाटक लवकरच रंगमंचावर येत आहे. 

पुतळ्यांची उंची वाढते आहे. माणूसकी खुजी होत चालली आहे. आता मिरवण्यापुरते उरलेत ते केवळ झेंडे. धर्म, भाषा, जात यामुळे देशाची विभागणी झाली आहे. अशात अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरच गदा आल्याचे चित्र आहे. या विषयावरच हे नाटक बोलते. जागो मोहन प्यारे, करून गेलो गाव, ठष्ट अशा नाटकांची निर्मिती करणार्या राहुल भंडारे यांनी या नाटकाची निर्मिती केला आहे. या नाटकाच्या संगीताची बाजू शाहीर संभाजी भगत यांनी सांभाळली आहे. 

डाॅ. दिलीप घारे, जयवंत शेवतेकर, रमाकांत भालेकर यांच्या यात मुख्य भूमिका आहेत.