'काॅमेडी विथ कपील'ची नवी टीम जाहीर

टीम इ सकाळ
बुधवार, 28 जून 2017

काॅमेडी विथ कपील या लोकप्रिय शोला गेल्या काही महिन्यांपासून ग्रहण लागले आहे. सुनील ग्रोव्हर आणि कपीलची वादावादी झाल्यानंतर त्यात भर पडली. सुनील आणि अली असगर यांनी हा शो सोडला होता. पण आज, या शोची नवी टीम जाहीर झाली. यात भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया या दोन नव्या चेहर्यांना स्थान मिळाले आहे. 

मुंबई : काॅमेडी विथ कपील या लोकप्रिय शोला गेल्या काही महिन्यांपासून ग्रहण लागले आहे. सुनील ग्रोव्हर आणि कपीलची वादावादी झाल्यानंतर त्यात भर पडली. सुनील आणि अली असगर यांनी हा शो सोडला होता. पण आज, या शोची नवी टीम जाहीर झाली. यात भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया या दोन नव्या चेहर्यांना स्थान मिळाले आहे. 

सुनील आणि अलीने हा शो सोडल्यानंतर चंदन प्रभाकरनेही या शोला सोडचिठ्ठी दिली. पण तीन महिन्यांच्या गॅप नंतर चंदन परत आला. अली आणि सुनीलची उणीव शोमध्ये भासत होती. ती अखेर नव्या कलाकारांना घेऊन पूर्ण झाली आहे. भारती, हर्षसह यात किकू शारदा, चंदन प्रभाकर, कपील ही मंडळी असतील. आता ते कोणत्या नव्या रूपात येतायत ते थेट पडद्यावर दाखवण्यात कपिल आणि कंपनीला जास्त रस आहे. 

टॅग्स

मनोरंजन

मुंबई : सध्या जुली 2 या चित्रपटामुळे राय लक्ष्मी भलतीच चर्चेत आली आहे. काही वर्षांपूर्वी तिच्या नावाची अशीच चर्चा झाली होती, कारण...

07.27 PM

मुंबई : काही दिवसांपूर्वी आरके स्टुडिओला लागलेल्या आगीत एेतिहासिक आरके स्टुडिओचे मोठे नुकसान झाले. अनेकांनी या घडल्या घटनेबद्दल...

06.30 PM

सुरत : गेले काही महिने सनी लिओनी सतत चर्चेत आहे. तिने केलेल्या जाहिराती, तिने केलेले सिनेमे इथपासून तिने दत्तक घेतलेली मुलगी अशी...

04.45 PM