नीलने घेतले 115 दिवसांचे प्रशिक्षण 

वृत्तसंस्था
सोमवार, 19 जून 2017

आणीबाणीवर आधारित असलेल्या "इंदू सरकार' चित्रपटात नील नितीन मुकेश हा संजय गांधींची भूमिका करणार आहे.

या भूमिकेसाठी नीलने 115 दिवसांचे प्रशिक्षण घेतले होते. याबाबत नील म्हणाला, 1975च्या आणीबाणीच्या वेळी माझा जन्मच झाला नव्हता. माझा जन्म 1982 चा. या चित्रपटाचे दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी मला या चित्रपटाची कथा ऐकवली. माझे इतिहास जरा कच्चे आहे. त्यामुळे मी त्यावेळची परिस्थिती जाणून घेण्यासाठी 115 दिवस दररोज एक ते दोन तास प्रशिक्षण घेतले. या काळात मी त्या वेळी घडलेल्या घटनांबाबत सखोल माहिती घेतली. 