बीफ बंदी होते, तर तंबाखू बंदी का नाही? 

टीम ई सकाळ
सोमवार, 5 जून 2017

'जन्नत 2', 'चक्रव्यूह' अशा सिनेमांमधून झळकलेली अभिनेत्री इशा गुप्ताने पंतप्रधानांना पत्र लिहिले आहे. देशात सुरू असलेली तंबाखूची दुकाने तातडीने बंद करायला हवीत. तंबाखूमुळे रोज जगभरात अडीच हजार माणसे मृत्यूमुखी पडतात. तर कोट्यवधी रुपये यात खर्च होतात. हे लक्षात घेता आता तंबाखूवर तातडीने बंदी आणायला हवी या आशयाचे पत्र तिने नरेंद्र मोदी यांना लिहीले आहे. 

मुंबई : 'जन्नत 2', 'चक्रव्यूह' अशा सिनेमांमधून झळकलेली अभिनेत्री इशा गुप्ताने पंतप्रधानांना पत्र लिहिले आहे. देशात सुरू असलेली तंबाखूची दुकाने तातडीने बंद करायला हवीत. तंबाखूमुळे रोज जगभरात अडीच हजार माणसे मृत्यूमुखी पडतात. तर कोट्यवधी रुपये यात खर्च होतात. हे लक्षात घेता आता तंबाखूवर तातडीने बंदी आणायला हवी या आशयाचे पत्र तिने नरेंद्र मोदी यांना लिहीले आहे. 

'नो टोबॅको डे'च्या निमित्ताने इशा बोलत होती. यावेळी तिने नो टोबॅको सप्ताहाचे उद्घाटन तिने केले. तंबाखूने आरोग्यास हानी पोचते. त्यामुळे सर्व तंबाखू विक्री केंद्रांवर बंदी घालावी अशी मागणीही तिने केली. आपल्या देशात जर बीफवर बंदी येऊ शकते, तर तंबाखूवर का नाही, असा सवालही तिने या पत्रात विचारला आहे.