प्रियांका चोप्रा सलग दुसऱ्यांदा हॉलिवूडची 'चॉईस'

वृत्तसंस्था
शुक्रवार, 20 जानेवारी 2017

लॉस एंजल्स- हॉलिवूडमध्ये यशस्वी पदार्पण केलेली भारतीय अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिला सलग दुसऱ्या वर्षी पीपल्स चॉईस पुरस्कारांमध्ये 'फेव्हरीट ड्रमॅटिक अॅक्ट्रेस'चा पुरस्कार मिळाला आहे. 

लॉस एंजल्स- हॉलिवूडमध्ये यशस्वी पदार्पण केलेली भारतीय अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिला सलग दुसऱ्या वर्षी पीपल्स चॉईस पुरस्कारांमध्ये 'फेव्हरीट ड्रमॅटिक अॅक्ट्रेस'चा पुरस्कार मिळाला आहे. 

प्रियांकाची हॉलिवूड मालिका 'क्वॉटिंको'साठी 'पीपल्स चॉईस' पुरस्कार मिळाला आहे. या मालिकेत तिने साकारलेली अॅलेक्स पॅरिशचे भूमिका गाजत आहेत. तिच्या अभिनयाचे जगभरातून कौतुक होत आहे.
हॉलिवूडमधील हा प्रतिष्ठेचा पुरस्कार सलग दुसऱ्यांदा मिळाल्याने प्रियांका सध्या खूश आहे. पुरस्कार स्वीकारल्यानंतर प्रियांका म्हणाली, "हा पुरस्कार माझ्यासाठी खूप खास आहे. माझ्यावर व माझ्या अभिनयावर विश्वास दाखविल्याबद्दल मी सर्व चाहत्यांचे आणि क्वांटिको टीमचे आभार मानते.' 

प्रियांका ही तिची आई मधू चोप्रा यांच्यासोबत पुरस्कार सोहळ्याला उपस्थित होती.
यावेळी प्रियांकासोबत लिली सिंग या आणखी एका भारतीय वंशाच्या यूटय़ुब स्टारला पिपल्स चॉईस पुरस्कार मिळाला आहे. लिलीला 'फेव्हरीट यूट्युब स्टार' या प्रकारात पुरस्कार मिळाला.
 

मनोरंजन

मुंबई : श्रावण सुरू झाला की मराठमोळया सणांची चाहूल लागते आणि गणेशोत्सवाचे वेध लागतात. मराठी चित्रपटसृष्टीही आपापल्या परीने...

शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

पुणे : ई सकाळने सकाळशी बांधिलकी जपलेल्या वाचकांची, प्रेक्षकांची नाळ ओळखून अनेक नवनवे उपक्रम राबवले आहेत. यामध्ये चित्रपटातील...

शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

मुंबई : अभिनेता सुनील तावडे सध्या स्टार प्रवाहच्या 'दुहेरी' या मालिकेतल्या परसू या बहुरंगी खलनायकी छटेच्या व्यक्तीरेखेमुळे  ...

शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017