प्रभास डार्लिंग 

वृत्तसंस्था
बुधवार, 15 फेब्रुवारी 2017

टॉलीवूडचा डार्लिंग आणि "बाहुबली' या ग्रॅंड चित्रपटातून घराघरांत पोहोचलेला स्टार प्रभास आता नवीन ऍक्‍शन चित्रपट करतोय. सुजित साईन हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहे. प्रभास या चित्रपटासाठी खूपच उत्सुक आहे. कारण त्यानिमित्ताने त्याला त्याच्या हक्काच्या टॉलीवूडनगरीत पुन्हा यायला मिळणारेय ना... नुकताच युवी प्रॉडक्‍शनच्या कार्यालयात या चित्रपटाचा मुहूर्त करण्यात आला आणि आता या चित्रपटाबद्दल त्याच्या चाहत्यांमध्ये एवढी उत्सुकता आहे की या चित्रपटाचे फॅनमेड पोस्टर्सही सोशल मीडियावर ट्रेंडिंग आहेत. प्रभासने बाहुबली या चित्रपटातून जबरदस्त ऍक्‍शनने प्रेक्षकांना बसल्या जागी थरार अनुभवायला लावला.

टॉलीवूडचा डार्लिंग आणि "बाहुबली' या ग्रॅंड चित्रपटातून घराघरांत पोहोचलेला स्टार प्रभास आता नवीन ऍक्‍शन चित्रपट करतोय. सुजित साईन हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहे. प्रभास या चित्रपटासाठी खूपच उत्सुक आहे. कारण त्यानिमित्ताने त्याला त्याच्या हक्काच्या टॉलीवूडनगरीत पुन्हा यायला मिळणारेय ना... नुकताच युवी प्रॉडक्‍शनच्या कार्यालयात या चित्रपटाचा मुहूर्त करण्यात आला आणि आता या चित्रपटाबद्दल त्याच्या चाहत्यांमध्ये एवढी उत्सुकता आहे की या चित्रपटाचे फॅनमेड पोस्टर्सही सोशल मीडियावर ट्रेंडिंग आहेत. प्रभासने बाहुबली या चित्रपटातून जबरदस्त ऍक्‍शनने प्रेक्षकांना बसल्या जागी थरार अनुभवायला लावला. साऊथच्या सिनेमामधली त्याची जबरदस्त ऍक्‍शन तिथल्या पॅन्सना परिचयाची आहेच. गेले वर्षभर तो "बाहुबली 2' साठी मेहनत घेतोय. आणि त्याचा हा टॉलीवूडमधला नवीन ऍक्‍शनपटही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल. त्यामुळे प्रभासच्या भाषेत सांगायचं डार्लिंग तो येतोय... 
 

Web Title: prabhas in action movie