अभिनेत्री प्रार्थना बेहेरे बांधणार अभिषेकशी लगीनगाठ

टीम ई सकाळ
शनिवार, 29 जुलै 2017

मितवा, जय महाराष्ट्र ढाबा बठिंडा, काॅफी आणि बरंच काही अशा चित्रपटांमधून अभिनय केलेली अभिनेत्री प्रार्थना बेहेरे आता लवकरच लग्न करणार आहे. दिग्दर्शक अभिषेक जावकर याच्यासोबत लग्न करण्याचा तिने निर्णय घेतला आहे. 

मुंबई : मितवा, जय महाराष्ट्र ढाबा बठिंडा, काॅफी आणि बरंच काही अशा चित्रपटांमधून अभिनय केलेली अभिनेत्री प्रार्थना बेहेरे आता लवकरच लग्न करणार आहे. दिग्दर्शक अभिषेक जावकर याच्यासोबत लग्न करण्याचा तिने निर्णय घेतला आहे. 

येत्या आॅगस्ट महिन्यात दोघे साखरपुडा करणार असून, नोव्हेंबर 2017 मध्ये ते लग्न करणार आहेत. प्रार्थनाने हिंदी चित्रपटातूनही काम केले आहेत. तसेच पत्रकारीतेपासून सुरूवात करणाऱ्या प्रार्थनाने हिंदीतील पवित्र रिश्ता या मालिकेतून मनोरंजन सृष्टीत पदार्पण केले. आता लग्नानंतर सिनेमात काम करणे ती चालू ठेवणार की काही वर्षे करिअरला रामराम ठोकणार ते मात्र काही काळानंतर कळेल.