प्रशांत दामले यांचा नवा शो 'खाता रहे मेरा दिल' 'कलर्स मराठी'वर

टीम ई सकाळ
बुधवार, 16 ऑगस्ट 2017

गेले अनेक वर्षे झी मराठीवरच्या आम्ही सारे खवय्येमधून रसिकांच्या तोंडात पाणी आणणारे अभिनेते प्रशांत दामले आता कलर्स मराठीकडे गेले आहेत. या वाहिनीने त्यांच्यासोबत एक नवा शो आणला असून याचं नाव आहे खाता रहे मेरा दिल. या मालिकेचा टीजर नुकताच या चॅनलने लाॅंच केला आहे. 

मुंबई : गेले अनेक वर्षे झी मराठीवरच्या आम्ही सारे खवय्येमधून रसिकांच्या तोंडात पाणी आणणारे अभिनेते प्रशांत दामले आता कलर्स मराठीकडे गेले आहेत. या वाहिनीने त्यांच्यासोबत एक नवा शो आणला असून याचं नाव आहे खाता रहे मेरा दिल. या मालिकेचा टीजर नुकताच या चॅनलने लाॅंच केला आहे. 

हा शो रूचकर तर असेलच, शिवाय तो खुसखुशीत पद्धतीने डिझाईन करण्यात आला आहे. याचा टीझर बघून त्याची खात्री पटते. या शोची कॅचलाईनही नवी चव.. नवा फील खाता रहे मेरा दिल अशी करण्यात आली आहे. हा शो 25 आॅगस्टपासून म्हणजे, बाप्पाच्या आगमनापासून तो  सुरू होत असून दुपारी दीड वाजता तो दाखवण्यात येईल.