तिरकस प्रश्नाला राय लक्ष्मीने दिलं समंजस उत्तर

टीम ई सकाळ
मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

सध्या जुली 2 या चित्रपटामुळे राय लक्ष्मी भलतीच चर्चेत आली आहे. काही वर्षांपूर्वी तिच्या नावाची अशीच चर्चा झाली होती, कारण ती आणि भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी यांच्या अफेअरची चर्चा रंगात होती. त्यानंतर राय लक्ष्मी फार चर्चेत नव्हती. आता जुली 2 च्या निमित्ताने ती माध्यमांना मुलाखती देताना दिसते आहे. त्यावेळी तिला धोनीबद्दल एक तिरकस प्रश्न विचारण्यात आला. त्यानंतर तिने जी प्रतिक्रीया दिली त्यानंतर मात्र सर्वांनाच तिच्या समंजसपणाचा अंदाज आला. 

मुंबई : सध्या जुली 2 या चित्रपटामुळे राय लक्ष्मी भलतीच चर्चेत आली आहे. काही वर्षांपूर्वी तिच्या नावाची अशीच चर्चा झाली होती, कारण ती आणि भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी यांच्या अफेअरची चर्चा रंगात होती. त्यानंतर राय लक्ष्मी फार चर्चेत नव्हती. आता जुली 2 च्या निमित्ताने ती माध्यमांना मुलाखती देताना दिसते आहे. त्यावेळी तिला धोनीबद्दल एक तिरकस प्रश्न विचारण्यात आला. त्यानंतर तिने जी प्रतिक्रीया दिली त्यानंतर मात्र सर्वांनाच तिच्या समंजसपणाचा अंदाज आला. 

इतर अनेक प्रश्न विचारून झाल्यावर धोनीबद्दल तुला आता काय वाटतं असा प्रश्न विचारला. त्यावर धोनी? कोण तो? असं हसत हसत विचारलं. नंतर मात्र तिने यावर नीट स्पष्टीकरण दिलं. ती म्हणाली, 'खरंतर हे आता कुठेतरी थांबायला हवं. खूप काळ गेला आहे. आता त्याचं लग्न झालं आहे. त्याला मुलं आहेत. तुमच्या आयुष्यात दरवेळी तुम्हाला हवं ते मिळतंच असं नाही. पण तुम्ही पुढं जायला हवं.' तिच्या या उत्तरानंतर मात्र सर्वांनीच तिचं कौतुक केलं. 

खरंतर पत्रकाराने हा प्रश्न विचारल्यानंतर आता ती काय उत्तर देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. धोनीचा विषय आता यात नको म्हणून चित्रपटाची टीमही सरसावली होती. पण एेनवेळी आलेल्या या प्रश्नाने मात्र साऱ्यांचीच भंबेरी उडवली. त्यानंतर राय लक्ष्मीने दिलेल्या उत्तरानंतर मात्र सर्वांचा जीव भांड्यात पडला. 

Web Title: raai laxmi on MS dhoni realationship esakal news