राजपाल यादवचे पहिले गाणे 

वृत्तसंस्था
मंगळवार, 14 मार्च 2017

"कुटुंब' या हिंदी चित्रपटाचा ध्वनिफीत प्रकाशन सोहळा अभिनेत्री राखी सावंत हिच्या हस्ते नुकताच मुंबईत करण्यात आला. या चित्रपटाचे निर्माते श्‍याम अवतार केडिया आणि दिग्दर्शक अमित श्री यादव आहेत. या चित्रपटाची एक खास बात म्हणजे "मालामाल विकली', "भुलभुलैय्या' अशा अनेक चित्रपटांतून विनोदी भूमिका करणारा विनोदी अभिनेता राजपाल यादव या चित्रपटात मुख्य भूमिका करतोय. इतकेच नाही तर त्याने या चित्रपटात पहिल्यांदाच एक गाणेही गायले आहे. तो या चित्रपटासाठी होळी गीत गायला आहे. या चित्रपटाचे संगीत आर्यन जैन याने दिले आहे. नव्या काळातील पांडवांची कहाणी म्हणजे "कुटुंब' हा चित्रपट!  

Web Title: Rajpal yadav first song