बाबा रामरहिमच्या मुलीच्या भूमिकेत राखी सावंत!

बुधवार, 20 सप्टेंबर 2017

मुंबई :  गुरमित राम रहिमच्या कारनाम्यांनी अवघी दुनिया अचंबित झाली होती. त्याची संपत्ती, त्याचे सिनेमे आणि आता त्याला शिक्षा सुनावल्या गेल्यानंतर त्याच्या आश्रमावर टाकलेल्या छाप्यात भुयारी मार्गापासून अनेक बाबी लोकांना कळल्या. पण हे कळण्याआधी आपली महती लोकांना कळावी म्हणून बाबानेच सिनेमाचा घाट घातला होता. आता तो सिनेमा पूर्ण झाला असून तो काही महिन्यांत रिलीज होणार आहे. विशेष बाब अशी की यात बाबाच्या धाकट्या मुलीचं हनीप्रित इन्सानची भूमिका साकारते आहे राखी सावंत. 

या चित्रपटाचे दिग्दर्शन आशुतोष मिश्रा करत असून बिग बाॅसचा स्पर्धक अजाझ खान यात बाबाची भूमिका साकारणार असल्याचे वृत्त आहे. काही महिन्यांपूर्वी राखीचा आणि गुरमितचा एक फोटो व्हायरल झाला होता. त्यावेळी राखी या दोघांचा सेल्फी काढत असल्याचे दिसते. बहुधा त्याला सिनेमाची पार्श्वभूमी असावी असे आता जाणकारांना वाटते. 

Web Title: rakhi sawant in new movie baba ram rahim esakal news