मी बऱ्याचदा खोटी, ठरलेली उत्तरे देतो: रणबीर

टीम ई सकाळ
सोमवार, 17 जुलै 2017

'माझे बाबा  प्रत्येक गोष्टीवर आपले मत मांडतात. ते प्रामाणिक आहेत. त्यांच्या मनात जे येईल ते ते बोलतात. पण मला तसे जमत नाही. मी बऱ्याचदा खोटी, ठरलेली उत्तरे देतो', अशी कबुली अभिनेता रणबीर कपूरने दिली आहे. 

मुंबई : माझे बाबा  प्रत्येक गोष्टीवर आपले मत मांडतात. ते प्रामाणिक आहेत. त्यांच्या मनात जे येईल ते ते बोलतात. पण मला तसे जमत नाही. मी बऱ्याचदा खोटी, ठरलेली उत्तरे देतो, अशी कबुली अभिनेता रणबीर कपूरने दिली आहे. 

सध्या जग्गा जासूस प्रदर्शिित झाल्यानंतर सर्वांचे लक्ष रणबीरकडे वळले आहे. त्याला अनेक बाबींवर प्रश्न विचारले जातात. त्यावेळी विचारलेल्या प्रश्नांना तो उत्तरेही देतो आहे. अशात ऋषी कपूर सतत काहीबाही स्फोटक बोलत असतात. अशावेळी या त्यांच्या वागण्याबद्दल कुणी विचारले असता त्याने हा खुलासा केला. माझे बाबा प्रमाणिक आहेत, त्यांना त्यांची अशी मते आहेत. ते ती मांडत असतात. त्याला धाडस लागते. पण मी तसा नाही. माझी उत्तरे ठरलेली असतात. बऱ्याचदा खोटी उत्तरे देऊन मी वेळ मारून नेतो, असे तो म्हणाला. 

टॅग्स