रणवीर अर्जुनचा "बेटर हाफ' 

वृत्तसंस्था
बुधवार, 12 एप्रिल 2017

बॉलीवूडचा बाजीराव रणवीर सिंग मित्र अर्जुन कपूरच्या लव लाईफविषयी फारच निराश आहे. त्याला त्रस्त पाहून रणवीरने अर्जुनचा "बेटर हाफ' (अर्धांगिनी) बनण्याचा निर्णय घेतला. नुकताच अर्जुन कपूर व श्रद्धा कपूर यांचा आगामी चित्रपट "हाफ गर्लफ्रेंड'चा ट्रेलर लॉंच करण्यात आला. त्यानंतर रणवीरने "हाफ गर्लफ्रेंड' चित्रपटाचा ट्रेलर ट्‌विट करून लिहिले की, "तुला रडताना पाहून मलाही रडू कोसळते. बाबा, तिला फक्त तुझी हाफ बनायचं आहे. जाऊ दे... मी तुझा दुसरा हाफ बनेन, "द बेटर हाफ'. फक्त तू रडू नकोस.' हे वाचून तुम्ही गोंधळला असाल ना. की अरे... या दोघांचं काय चाललंय.

बॉलीवूडचा बाजीराव रणवीर सिंग मित्र अर्जुन कपूरच्या लव लाईफविषयी फारच निराश आहे. त्याला त्रस्त पाहून रणवीरने अर्जुनचा "बेटर हाफ' (अर्धांगिनी) बनण्याचा निर्णय घेतला. नुकताच अर्जुन कपूर व श्रद्धा कपूर यांचा आगामी चित्रपट "हाफ गर्लफ्रेंड'चा ट्रेलर लॉंच करण्यात आला. त्यानंतर रणवीरने "हाफ गर्लफ्रेंड' चित्रपटाचा ट्रेलर ट्‌विट करून लिहिले की, "तुला रडताना पाहून मलाही रडू कोसळते. बाबा, तिला फक्त तुझी हाफ बनायचं आहे. जाऊ दे... मी तुझा दुसरा हाफ बनेन, "द बेटर हाफ'. फक्त तू रडू नकोस.' हे वाचून तुम्ही गोंधळला असाल ना. की अरे... या दोघांचं काय चाललंय. खरं तर ट्रेलरमध्ये श्रद्धा अर्जुनला म्हणते की ती फक्त त्याची "हाफ गर्लफ्रेंड' बनू शकते. या गोष्टीला घेऊन अर्जुन खूप दु:खी व त्रस्त दिसतो; मात्र रणवीरच्या या विनोदी प्रस्तावाचं उत्तरही अर्जुनने त्याच अंदाजात ट्‌विट करून दिलं आहे की, "तू माझा भाऊ आहेस आणि ती माझी प्राण. भावासाठी मी माझे प्राणही देऊ शकतो. तू माझ्यासाठी "फुल ऍण्ड फायनल' आहेस आणि सदैव राहशील.'