वरुण धवन सोनी सबचा ऍम्बेसिडर 

वृत्तसंस्था
बुधवार, 28 जून 2017

मुंबई : लोकप्रिय कौटुंबिक वाहिनी "सोनी सब' आता नव्या रूपात दाखल होत आहे. या वाहिनीवर आता नव्या विनोदी मालिका पाहायला मिळणार आहेत. सोनी सबचा "हॅप्पीनेस ऍम्बेसिडर' म्हणून अभिनेता वरुण धवनची निवड करण्यात आली आहे.

याबाबत वरुण धवनने सांगितले की, सबचा हॅप्पीनेस ऍम्बेसिडर म्हणून वाहिनीसोबत लाखो भारतीयांमध्ये आनंद आणि हसू पसरविण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. "सब'वरील आगळ्यावेगळ्या मालिका मला नेहमीच आवडल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या नवीन मालिकांबद्दल खूप उत्सुकता आहे. 
सोनी सब वाहिनीवर नुकत्याच सुरू झालेल्या "सजन रे फिर झूठ मत बोलो' या मालिकेसोबतच "टीव्ही, बीवी और मैं', तेनाली रामा, "शंकर जय किशन 3 इन 1' आणि "आदत से मजबूर' या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.