नील नितीन मुकेश संजय गांधीच्या भूमिकेत 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 10 मार्च 2017

अभिनेता नील नितीन मुकेश गेले काही दिवस त्याच्या लग्नामुळे चांगलाच चर्चेत आला होता. लग्न मोठ्या थाटामाटात पार पडल्यानंतर आता तो पुन्हा चर्चेत आला आहे. मात्र वेगळ्या कारणासाठी. 1973 सालच्या आणीबाणीच्या काळावर आधारित चित्रपट "इंदु सरकार'मध्ये संजय गांधी यांची भूमिका तो साकारणार आहे. मधुर भांडारकर यांचा आगामी चित्रपट "इंदु सरकार'मधील नीलचा लूक सोशल मीडियावर लीक झाला आहे. यातील नीलचा लूक संजय गांधी यांच्यासारखा हुबेहूब वाटतोय. या चित्रपटात इंदिरा गांधीच्या भूमिकेत सुप्रिया विनोद दिसणार आहे.

अभिनेता नील नितीन मुकेश गेले काही दिवस त्याच्या लग्नामुळे चांगलाच चर्चेत आला होता. लग्न मोठ्या थाटामाटात पार पडल्यानंतर आता तो पुन्हा चर्चेत आला आहे. मात्र वेगळ्या कारणासाठी. 1973 सालच्या आणीबाणीच्या काळावर आधारित चित्रपट "इंदु सरकार'मध्ये संजय गांधी यांची भूमिका तो साकारणार आहे. मधुर भांडारकर यांचा आगामी चित्रपट "इंदु सरकार'मधील नीलचा लूक सोशल मीडियावर लीक झाला आहे. यातील नीलचा लूक संजय गांधी यांच्यासारखा हुबेहूब वाटतोय. या चित्रपटात इंदिरा गांधीच्या भूमिकेत सुप्रिया विनोद दिसणार आहे. या दोघांव्यतिरिक्त अनुपम खेर, कीर्ती कुल्हारी आणि टोटा रॉय चौधरी या कलाकारांच्याही यात महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला डिसेंबरमध्ये सुरुवात झालीय.