रिव्ह्यू Live : कच्चा लिंबू : स्पेशल कुटुंबाची अनुभवण्याजोगी दुनिया

सौमित्र पोटे/ कॅमेरा : योगेश बनकर.
शुक्रवार, 11 ऑगस्ट 2017

पटकथा, संवाद, संकलन, संगीत या सर्व बाबतीत या चित्रपटाने चांगली कामगिरी बजावली आहे. विशेषत; माझे आई बाबा हे गाणं ओठांवर रूळणारं ठरलं आहे. या सर्वच टीमचे अभिनंदन. एक चांगला चित्रपट पाहिल्याचा अनुभव हा चित्रपट देतो. 

पुणे : प्रसाद ओक दिग्दर्शित कच्चा लिंबू हा चित्रपट आज रिलीज झाला. सोलो दिग्दर्शक म्हणून त्याचा हा पहिलाच सिनेमा. जयवंत दळवी लिखित ऋणानुबंध या कथेवर हा चित्रपट बनला आहे. मन्मीत पेम, रवी जाधव, सोनाली कुलकर्णी, सचिन खेडेकर यांच्या अभिनयाने नटलेला असा हा चित्रपट आहे. अभिनयासह, दिग्दर्शन, संगीत, लेखन या सर्वच पातळ्यांवर या चित्रपटाने उत्तम कामगिरी केल्याने ई सकाळने या चित्रपटाला दिले आहेत 4 चीअर्स. 

रिव्ह्यू Live : कच्चा लिंबू

ही गोष्ट आहे बच्चू आणि त्याच्या आई बाबांची. हा बच्चू स्पेशल आहे हे सिनेमाचा ट्रेलर बघून आलं असेलच लक्षात. या स्पेशल बच्चूचे आई बाबाही स्पेशल आहेत. या बच्चूला वाढवताता वैयक्तीक, कौटुंबिक आणि व्यावसायिक पातळीवर या काटदरे कुटुंबाला काय काय तडजोड करावी लागते त्याचा हा अनुभव आहे. 

प्रसाद ओक आणि त्याच्या टीमने अत्यंत मेहनतीने हा चित्रपट बनवला आहे. हा सिनेमा कृष्ण धवल आहे. त्याचं विश्लेषण लाईव्ह रिव्ह्यूमध्ये करण्यात आलेलं आहेच. पुण्याच्या अभिरूची माॅलमध्ये हा चित्रपट पाहिल्यानंतर याचा रिव्ह्यू करण्यात आला. हा रिव्ह्यू करण्यासाठी कलाकारांची टीम उपस्थित राहू शकली नाही. पण दिग्दर्शक प्रसाद ओक मात्र हा रिव्ह्यू लाईव्ह पाहात होते ते ई सकाळच्या पेजवरून. ई सकाळने या चित्रपटाला 4 चीअर्स दिल्याने त्याने टीमचे आभारही मानले. 

पटकथा, संवाद, संकलन, संगीत या सर्व बाबतीत या चित्रपटाने चांगली कामगिरी बजावली आहे. विशेषत; माझे आई बाबा हे गाणं ओठांवर रूळणारं ठरलं आहे. या सर्वच टीमचे अभिनंदन. एक चांगला चित्रपट पाहिल्याचा अनुभव हा चित्रपट देतो.