चिंटूचे बाबा बिग बी 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 19 मे 2017

बिग बी म्हणजेच द अमिताभ बच्चन अभिनेता आणि चिंटू म्हणजेच ऋषी कपूर. हे दोघेही पिता- पुत्राच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत आणि वडील कोण होणार आहे तर अमिताभ. हे ऐकल्यावर जरा गोंधळलात ना...

बिग बी म्हणजेच द अमिताभ बच्चन अभिनेता आणि चिंटू म्हणजेच ऋषी कपूर. हे दोघेही पिता- पुत्राच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत आणि वडील कोण होणार आहे तर अमिताभ. हे ऐकल्यावर जरा गोंधळलात ना...

अहो हो. हे खरंय. "102 नॉटआऊट' चित्रपटात हे दोघं बापलेकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. यात अमिताभ बच्चन यांचं वय 102 असणार आणि 75 वर्षांच्या रोलमध्ये ऋषी कपूर असणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक उमेश शुक्‍ला आहेत. याची कथा 102 वर्षीय दत्ताराय वखारियाभोवती फिरते. या वयातही दत्ताराय खूप महत्त्वाकांक्षी आहेत; तर त्यांचा 75 वर्षीय मुलगा बाबू सनकी आणि चिडचिडा आहे. हा सिनेमा लोकप्रिय गुजराती नाटक "102 नॉटआऊट'वर आधारित आहे.

यात अमिताभ बच्चन 102 वर्षांचे वयोवृद्ध दिसण्यासाठी प्रोस्थेटिक (कृत्रिम) मेकअपचा वापर करणार आहेत. 1991 मध्ये अमिताभ बच्चन व ऋषी कपूर "अजूबा' चित्रपटात एकत्र दिसले होते. त्याशिवाय या दोघांनी मनमोहन देसाई यांच्या "अमर अकबर अँथनी', "नसीब' आणि "कुली' सिनेमात काम केलंय. आता या दोघांना बापलेकाच्या भूमिकेत पाहण्याची उत्सुकता वाढलीय.