सलीम खान यांच्या यशाचा प्रवास 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 फेब्रुवारी 2017

प्रसिद्ध लेखक सलीम खान अभिनय क्षेत्रात नशीब आजमावण्यासाठी मुंबईत आले. काही प्रमुख भूमिका करूनही त्यांना हवे तसे यश मिळाले नाही. त्यामुळे त्यांनी चित्रपटांसाठी पटककथा आणि संवाद लिहायला सुरुवात केली. जावेद अख्तर यांच्यासोबत त्यांची जोडी जमली होती. "सलीम-जावेद' या जोडीने नंतर दीवार, डॉन, शोले आणि त्रिशूल यासारख्या अनेक चित्रपटांचे लेखन केले. त्यांच्या चित्रपटसृष्टीतील यशाचा प्रवास शनिवारी (ता. 4) संध्याकाळी 7 वाजता झी क्‍लासिक वाहिनीवरील "माय लाइफ माय स्टोरी'मध्ये दाखविण्यात येणार आहे.

प्रसिद्ध लेखक सलीम खान अभिनय क्षेत्रात नशीब आजमावण्यासाठी मुंबईत आले. काही प्रमुख भूमिका करूनही त्यांना हवे तसे यश मिळाले नाही. त्यामुळे त्यांनी चित्रपटांसाठी पटककथा आणि संवाद लिहायला सुरुवात केली. जावेद अख्तर यांच्यासोबत त्यांची जोडी जमली होती. "सलीम-जावेद' या जोडीने नंतर दीवार, डॉन, शोले आणि त्रिशूल यासारख्या अनेक चित्रपटांचे लेखन केले. त्यांच्या चित्रपटसृष्टीतील यशाचा प्रवास शनिवारी (ता. 4) संध्याकाळी 7 वाजता झी क्‍लासिक वाहिनीवरील "माय लाइफ माय स्टोरी'मध्ये दाखविण्यात येणार आहे. इतकेच नाही, तर मुलगा सलमान खानसोबतचे त्यांचे संबंध आणि अन्य अनेक गोष्टींवर सलीम यांनी दिलखुलास गप्पा या शोमध्ये मारल्या आहेत. 

Web Title: salim khan success Review