सलमान-कतरिनाचा "रात बाकी' 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 मे 2017

बॉलीवूडचा दबंग खान सलमान आणि निर्माता-दिग्दर्शक करण जोहर यांनी "कुछ कुछ होता है' सिनेमात एकत्र काम केल्यानंतर आता बऱ्याच वर्षांनंतर करण सलमानला घेऊन सिनेमा बनविण्याचा विचार करतोय.

बॉलीवूडचा दबंग खान सलमान आणि निर्माता-दिग्दर्शक करण जोहर यांनी "कुछ कुछ होता है' सिनेमात एकत्र काम केल्यानंतर आता बऱ्याच वर्षांनंतर करण सलमानला घेऊन सिनेमा बनविण्याचा विचार करतोय.

या सिनेमाचं नाव "रात बाकी' असून, दबंग खानसह यात बार्बी गर्ल कतरिना कैफही असल्याचं बोललं जातंय. म्हणजे पुन्हा एकदा सलमान-कतरिनाची केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. सुरुवातीला अशी चर्चा होती की, करण फवाद खान आणि कतरिनाला घेऊन हा चित्रपट बनविणार होता; पण मध्यंतरी भारत-पाकिस्तान यांच्यात झालेल्या खराब संबंधांमुळे फवादचं बॉलीवूडसोबतचं नातं तुटलं. त्या वेळी "रात बाकी' हे सिनेमाचं नाव मात्र ठरलं होतं. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, आता या चित्रपटात सलमानची वर्णी लागलीय. सध्या या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम सुरू असून, लवकरच चित्रीकरणाला सुरुवात होईल.