मौनी रॉयचे 'गुरुजी' सल्लूमियाँ

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 एप्रिल 2017

सलमानने बऱ्याच वेळेला मौनीला हिंदी चित्रपटात काम करण्याबद्दल सुचवले होते; मात्र आता खुद्द सलमान गुरुजीच तिला बॉलिवूडमध्ये लॉंच करण्याच्या तयारीत आहे. इतकंच नाही तर सलमानने याबाबत अरबाजसोबत बातचीतही केलीय. असं सांगितलं जातंय की अरबाज एक पटकथा लिहित आहे.

बॉलिवूडचा सल्लूमियाँ ज्याला कोणाला पसंत करतो. त्याचं करियर जवळपास सेट होऊन जातं. या यादीत अनेक नायिकांचा समावेश आहे. छोट्या पडद्यावरील आतापर्यंत अशी कोणी नाही जिच्यावर सलमानची नजर पडली असेल शिवाय एकीच्या. आता ही कोण? असा प्रश्‍न तुम्हाला पडला असेल ना. ती म्हणजे नागिन फेम मौनी रॉय. 

हे तर तुम्हाला माहितच असेल ना की बिग बॉस या रिअॅलिटी शोच्या नवव्या व दहाव्या सीझनच्या दरम्यान सल्लूने या शोमध्ये मौनीला आमंत्रित केले होते. बिग बॉसच्या दहाव्या सीझनच्या अंतिम सोहळ्यात सलमान आणि मौनीने एकत्र नृत्य केलं होतं. तेव्हापासून सलमान तिचे सारखेच गोडवे गात असतो. 

सूत्रांच्या माहितीनुसार सलमानने बऱ्याच वेळेला मौनीला हिंदी चित्रपटात काम करण्याबद्दल सुचवले होते; मात्र आता खुद्द सलमान गुरुजीच तिला बॉलिवूडमध्ये लॉंच करण्याच्या तयारीत आहे. इतकंच नाही तर सलमानने याबाबत अरबाजसोबत बातचीतही केलीय. असं सांगितलं जातंय की अरबाज एक पटकथा लिहित आहे. त्यात मौणीची वर्णी लागू शकते. बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी याच्यापेक्षा चांगला मार्ग असूच शकत नाही. त्यामुळे आता मौली सल्लूमियाँच्या चित्रपटात झळकते का हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. 
 

Web Title: salman khan mentors mouni roy?