'ट्युबलाईट'च्या अपयशानंतर सलमान वितरकांना देणार नुकसान भरपाई

टीम ई सकाळ
रविवार, 23 जुलै 2017

'अशाप्रकारे सलमान मदत करेल याची आम्हाला अजिबात कल्पना नव्हती. कारण आपल्याकडे असे पाऊल कोणीच उचलत नाही. त्याने घेतलेल्या या निर्णयाचे सर्वांनी स्वागत करायला हवे, शिवाय हा धडा गिरवायला हवा.'

मुंबई : गेल्या ईद दिवशी सगळ्यांचे लक्ष लागले होते ते सलमान खानच्या ट्युबलाईटकडे. या चित्रपटाची चांगली हवा होती. चित्रपट जवळपास पाच हजार थिएटर्समध्ये रिलीज झाला. पण सलमानची जादू यावेळी चालली नाही. 

शंभर कोटींचा गल्ला जमा करायला या चित्रपटाला तब्बल आठवडा लागला. असे करूनही सिनेमा हिट या वर्गवारीत मोडला नाही. यामुळे वितरकांना मात्र मोठे नुकसान सोसावे लागले. पण त्यांच्या मदतीला आता खुद्द सलमान धावून आला आहे. ट्युबलाईटच्या अपयशानंतर सलमानने वितरकांना नुकसान भरपाई द्यायचे ठरवले आहे. याबाबत बोलताना या चित्रपटाचे वितरक जे.पी.चोकसे म्हणाले, 'अशाप्रकारे सलमान मदत करेल याची आम्हाला अजिबात कल्पना नव्हती. कारण आपल्याकडे असे पाऊल कोणीच उचलत नाही. त्याने घेतलेल्या या निर्णयाचे सर्वांनी स्वागत करायला हवे, शिवाय हा धडा गिरवायला हवा.सलमानच्या या चित्रपटाकडून खूप अपेक्षा होत्या. पण त्याची एकूण असलेली इमेज आणि त्याला या सिनेमात दिलेली भूमिका कमालीची भिन्न असल्यामुळे लोकांनी या सिनेमाकडे पाठ फिरवली.'

टॅग्स