साकिब सुरू करणार हॉटेल 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 7 एप्रिल 2017

"मेरे डॅड की मारुती'मधून नवीन ओळख मिळालेला साकिब सलीम "मखना' चित्रपटातून तापसी पन्नूसोबत झळकणार आहे. त्यानं नुकतीच चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. याशिवायही त्याचे अनेक उद्योग सुरू आहेत. खरं तर साकिब दिल्लीत लहानाचा मोठा झाला. त्याच्या बाबांची दिल्लीत अनेक रेस्टॉरंटस्‌ आहेत. शुद्ध मोगलाई जेवण तेथे मिळते. असंच हॉटेल मुंबईतही सुरू करण्याचा साकिबचा विचार आहे. त्यासाठी त्याचे सध्या प्रयत्न सुरू आहेत. हॉटेलसाठी तो जागा शोधत आहे. साकिब म्हणतो, की माझे बाबा आणि मी याबाबत खूप दिवसांपासून चर्चा करत होतो. आता कुठे मी त्यासाठी काम सुरू केलं आहे. या व्यवसायात यश मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील.

"मेरे डॅड की मारुती'मधून नवीन ओळख मिळालेला साकिब सलीम "मखना' चित्रपटातून तापसी पन्नूसोबत झळकणार आहे. त्यानं नुकतीच चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. याशिवायही त्याचे अनेक उद्योग सुरू आहेत. खरं तर साकिब दिल्लीत लहानाचा मोठा झाला. त्याच्या बाबांची दिल्लीत अनेक रेस्टॉरंटस्‌ आहेत. शुद्ध मोगलाई जेवण तेथे मिळते. असंच हॉटेल मुंबईतही सुरू करण्याचा साकिबचा विचार आहे. त्यासाठी त्याचे सध्या प्रयत्न सुरू आहेत. हॉटेलसाठी तो जागा शोधत आहे. साकिब म्हणतो, की माझे बाबा आणि मी याबाबत खूप दिवसांपासून चर्चा करत होतो. आता कुठे मी त्यासाठी काम सुरू केलं आहे. या व्यवसायात यश मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील. मी खूप खुश आहे, की यानिमित्त मला बाबांसोबत काम करण्याची संधी मिळणार आहे. 

Web Title: saqib saleem start a hotel in mumbai