सारा अली खान करणार बाॅलिवूडमध्ये पदार्पण

टीम ई सकाळ
शनिवार, 27 मे 2017

अभिनेता सैफ अली खान आणि अमृता सिंगची मुलगी सारा आता हिॆदी सिनेसृष्टीत यायला सज्ज झाली आहे. अभिषेक कपूर दिग्दर्शित केदारनाथ या चित्रपटातून ती भूमिका साकारते आहे. या सिनेमात तिचा जोडीदार असेल सुशांतसिंह रजपूत. 

मुंबई : अभिनेता सैफ अली खान आणि अमृता सिंगची मुलगी सारा आता हिॆदी सिनेसृष्टीत यायला सज्ज झाली आहे. अभिषेक कपूर दिग्दर्शित केदारनाथ या चित्रपटातून ती भूमिका साकारते आहे. या सिनेमात तिचा जोडीदार असेल सुशांतसिंह रजपूत. 

यापूर्वी साराच्या पदार्पणासाठी सैफ चांगला बॅनर आणि दिग्दर्शक शोधत होता. काही दिवसांपूर्वी सारा करण जोहरच्या सिनेमातून अवतरणार अशा बातम्याही आल्या होत्या. पण आता मात्र या सर्व चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. करणच्या स्टुडंट आॅफ द इयर 2 मधूनही ती येणार होती. वास्तविक, साराने आपल्या इंडस्ट्रीत येऊ नये असे सैफला वाटत होते. याची आठवण त्याला करून दिल्यावर तो म्हणाला, आता कुणाला ब्लेम करणार.. अभिनय तिलाा रक्तातून मिळाला आहे.