सैफची मुलगी आली रे!

रविवार, 8 ऑक्टोबर 2017

गेल्या अनेक दिवसांपासून केदारनाथ हा चित्रपट चर्चेत आहे. कारण या चित्रपटातून सैफ अली खान आणि अमृता सिंगची मुलगी सारा सिनेसृष्टीत पदार्पण करते आहे. आज रविवारी या चित्रपटातील साराचा लूक लोकार्पण करण्यात आला. 

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून केदारनाथ हा चित्रपट चर्चेत आहे. कारण या चित्रपटातून सैफ अली खान आणि अमृता सिंगची मुलगी सारा सिनेसृष्टीत पदार्पण करते आहे. आज रविवारी या चित्रपटातील साराचा लूक लोकार्पण करण्यात आला. 

या लूकमध्ये सारा एकदम फ्रेश लूकमध्ये दिसते आहे. नक्षीदार छत्री घेऊन हातात कसलीशी पर्स घेऊन सारा केदारनाथ परिसरात फिरताना दिसते आहे. केदारनाथ या चित्रपटाचं पहिलं शेड्युल नुकतंच संपलं आहे. याबाबत बोलताना दिग्दर्शक अभिषेक कपूर म्हणाला, हा प्रवास फार सुंदर आहे. चित्रपटाच्या शूटला मजा येते आहे. पण या पर्वतरांगांमध्ये कमालीची शांतता आहे. या चित्रपटातही ती तुम्हाला दिसेल. 

सारा अली मात्र याबाबत फार काही बोलत नाहीय. तिचा लूक रिविल करून तिला मीडीयापासून लांब ठेवण्यात आलं आहे.