केदारनाथमध्ये सारा अली खान 

वृत्तसंस्था
मंगळवार, 13 जून 2017

बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानची मुलगी सारा अली खान बॉलीवूडमध्ये लवकरच पदार्पण करणार असल्याची चर्चा बऱ्याच काळापासून सुरू होती. अखेर या चर्चेला पूर्णविराम लागलाय. ती अभिनेता सुशांत सिंग राजपूतसोबत झळकण्यासाठी सज्ज झाली आहे आणि या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत अभिषेक कपूर.

सूत्रांच्या माहितीनुसार या चित्रपटाचं नाव आहे "केदारनाथ'. नुकतंच सारा व अभिषेक कपूरचे केदारनाथ येथील छायाचित्र सोशल मीडियावर वायरल झाले आहे. त्यामुळे या सिनेमाचं नाव "केदारनाथ' असेल, असं म्हटलं जात आहे. या चित्रपटापूर्वी साराचे बऱ्याच चित्रपटांशी आणि अभिनेत्यांसोबत नाव जोडले गेले होते. सारानं यशराज फिल्म्सच्या "ठग्ज ऑफ हिंदुस्तान'साठी ऑडिशन दिली होती; मात्र आदित्य चोप्रानं तिला रिजेक्‍ट केलं. तसंच करण जोहरच्या "स्टुडंट ऑफ द इयर'च्या सिक्वेलमध्येही तिची वर्णी लागली नाही. तर साराच्या आईची म्हणजेच अमृता सिंगची, साराने आमीरच्या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करावं अशी इच्छा होती; पण तेही शक्‍य झाले नाही. शेवटी आता ती सुशांत सिंग राजपूत आणि अभिषेक कपूर यांच्यासोबत बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झालीय. सारा तिच्या बॉलीवूडमधील पदार्पणासाठी खूपच उत्सुक आहे.