शाहरूख पुन्हा "किंग ऑफ रोमान्स' 

वृत्तसंस्था
सोमवार, 12 जून 2017

बॉलीवूडचा किंग खान शाहरूख अभिनेत्री अनुष्का शर्माबरोबर पुन्हा एकदा एका रोमॅंटिक भूमिकेत दिसणार आहे. "रब ने बना दी जोडी' आणि "जब तक है जान' सिनेमांत दोघांची परफेक्‍ट केमिस्ट्री पाहायला मिळाली.

दोघांच्या वयात मोठा फरक असला, तरी प्रेक्षकांनी त्यांच्या जोडीचं स्वागत केलं. आता इम्तियाज अलीच्या "जब हॅरी मेट सेजल' अशा हटके नाव असलेल्या सिनेमात ते रोमान्स करताना दिसतील. नुकतंच सिनेमाचं पोस्टर झळकलं. "वॉट यू सिक इज सिकिंग यू' अशा टॅगलाईनमुळे चित्रपटाबाबतची उत्सुकता आधीच वाढलीय. चित्रपटाच्या शीर्षकाबाबत सुरुवातीला बरेच तर्कवितर्क लावले जात होते.

"द रिंग' किंवा "रहनुमा' असं त्याचं शीर्षक असेल, अशी चर्चा होती; पण अखेर "जब हॅरी मेट सेजल' फायनल झालं. सिनेमात शाहरूख पुन्हा एकदा आपल्याला त्याच्या "किंग ऑफ रोमान्स' इमेजमध्ये दिसेल. चित्रपट अर्थातच रोमॅंटिक आहे. प्राग, लिस्बन, ऍमस्टरडॅम आणि बुडापेस्टमध्ये त्याचं शूटिंग झालंय. 7 ऑगस्टला तो रिलीज होतोय... रोमॅंटिक जॉनर मोठ्या प्रेमाने हाताळणारा इम्तियाज अली दिग्दर्शक असल्याने शाहरूख-अनुष्काच्या फॅन्सना नक्कीच एक म्युझिकल ट्रीट मिळेल, यात शंका नाही.