शेरनुला टीआरपीची भीती 

संकलन : भक्ती परब  
सोमवार, 20 मार्च 2017

"इश्‍कबाज' मालिकेत ओमकारा सिंग ओबेरॉयच्या प्रेयसीची भूमिका करणारी वृषिका मेहता अचानक मालिकेतून गायब झाली. त्यानंतर कारण सांगण्यात आलं की, त्या दोघांच्या जोडीला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला नही आणि तेव्हा तर मालिका टीआरपीच्या स्पर्धेत स्थान मिळवण्यासाठी धडपडत होती. पण त्यानंतर शिवाय आणि अनिकाच्या जोडीने या मालिकेला तारलं आणि मालिका टीआरपीच्या स्पर्धेत आली. मग या मालिकेतील पात्रांना घेऊन दुसरी मालिका "दिल बोले ओबेरॉय' सुरू झाली. यात ओमकाराची प्रेमकथा केंद्रस्थानी दाखवायचं ठरलं. मग काय, ओमकाराच्या प्रेयसीसाठी शोधाशोध सुरू झाली.

"इश्‍कबाज' मालिकेत ओमकारा सिंग ओबेरॉयच्या प्रेयसीची भूमिका करणारी वृषिका मेहता अचानक मालिकेतून गायब झाली. त्यानंतर कारण सांगण्यात आलं की, त्या दोघांच्या जोडीला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला नही आणि तेव्हा तर मालिका टीआरपीच्या स्पर्धेत स्थान मिळवण्यासाठी धडपडत होती. पण त्यानंतर शिवाय आणि अनिकाच्या जोडीने या मालिकेला तारलं आणि मालिका टीआरपीच्या स्पर्धेत आली. मग या मालिकेतील पात्रांना घेऊन दुसरी मालिका "दिल बोले ओबेरॉय' सुरू झाली. यात ओमकाराची प्रेमकथा केंद्रस्थानी दाखवायचं ठरलं. मग काय, ओमकाराच्या प्रेयसीसाठी शोधाशोध सुरू झाली. तेव्हा खूप निवडानिवडी करून शेरनु पारेख या गुणी अभिनेत्रीची निवड झाली आणि मालिका दणक्‍यात सुरू झाली. सध्या शेरनुचा सहकलाकार कुणाल जयसिंग म्हणजेच ओमकारा त्याच्या लग्नाच्या अफवांमुळे मीडियावर नाराज झालाय म्हणून पत्रकारांनी शेरनुला गाठलं. तिला विचारलं की, कशी चाललीय तुझी "दिल बोले ओबेरॉय' ही मालिकाय तेव्हा शेरनु म्हणाली, मला टीआरपीची खूपच भीती वाटते. आणि ती पुढे असंही म्हणाली, छोट्या पडद्यावरच्या सर्वच कलाकारांनी टीआरपीला घाबरायलाच हवं. कारण पाण्यात राहून माशाशी वैर धरता येत नाही. तसंच छोट्या पडद्यावर राहून टीआरपीमुळे फरक पडत नाही, असं म्हणता येत नाही. त्यामुळे मालिकेचा टीआरपी वाढला पाहिजे, अशी शेरनु म्हणजेच "दिल बोले ओबेरॉय' मालिकेतल्या गौरीची इच्छा आहे. 
बाकी शेरनुचं म्हणणं पटण्यासारखंच आहे. "टीआरपीसाठी काहीही' हा नियम असलेल्या मालिकांच्या विश्‍वात टीआरपीची भीती वाटणारच ना... 

टॅग्स