शो स्टॉपर करिना 

वृत्तसंस्था
मंगळवार, 7 फेब्रुवारी 2017

करिना कपूर लॅक्‍मेची ब्रॅण्ड ऍम्बॅसिडर आहे, हे सगळ्यांनाच माहित्येय. त्यामुले लॅक्‍मे फॅशन वीकमध्ये करिनाने रॅम्प वॉक केला नाही, हे शक्‍यच नाही. मग ती अगदी प्रेग्नंट असताना असो किंवा तिने एका मुलाला नुकताच जन्म दिलेला असो. करिना म्हणते, काम हे तिचं पॅशन आहे. त्यामुळे ती कधी थांबलीच नाही. सहा दिवस चालणाऱ्या लॅक्‍मे फॅशन वीकची धामधूम काल संपली. हा फॅशन वीक अनिता डोंगरे या प्रसिद्ध डिझायनरच्या "लिक्विड गोल्ड' ही थीम घेऊन बांद्रा फोर्ट येथे पार पडला. लॅक्‍मेच्या "अर्गन ऑईल लीप कलर' या नवीन प्रॉडक्‍टशी साधर्म्य साधण्यासाठी ही थीम ठेवली होती. या फिनालेमध्ये करिना कपूरने शो स्टॉपर म्हणून रॅम्प वॉक केला. या वेळी तिने गोल्डन शेड असलेला पांढऱ्या रंगाचा पेहराव केला होता. नुकतीच आई झालेल्या करिनाच्या चेहऱ्यावरचे तेज या गोल्डन थीममुळे आणखीनच लखलखत होते. मागच्या वर्षी करिनाने गरोदर असताना सब्यासाची मुखर्जी या डिझायनरसाठी रॅम्प वॉक केला होता. करिना या वेळी म्हणाली, "मी एका मुलाला जन्म देऊन फक्त 46 दिवस झालेत आणि परत काम करताना खूप आनंद वाटतोय आणि खूप छान वाटतंय. कारण मी मला जे आवडतं तेच करते. काम करणं माझ्या रक्तात आहे. माझ्यापासून ते काहीही झालं तरी वेगळं होऊ शकत नाही.' 

(छायाचित्र सौजन्य : लॅक्‍मे फॅशन वीक इन्स्टाग्राम)

मनोरंजन

मुंबई : टिना दत्ता हे नाव हिंदीवरच्या छोट्या पडद्याला नवं नाही. उतरन मालिकेतील तिची भूमिका खूप गाजली. टिना सोशल मिडीयावरही बरीच...

मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

मुंबई : ‘अन्न हे पूर्णब्रम्ह’ असं म्हणतात हे योग्यचं आहे. नवे खमंग, चविष्ट, खुशखुशीत असे पदार्थ खायला कुणाला आवडत नाही. खरतर...

मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

मुंबई : आयुष्य संपल तरी प्रेम मरत नाही या कथासूत्रावर सुरु झालेली मालिका आता खरोखरच त्या वळणावर येऊन पोहोचली आहे. शांभवी आणि...

मंगळवार, 22 ऑगस्ट 2017