श्रीदेवी "मॉम' 

वृत्तसंस्था
बुधवार, 24 मे 2017

'मॉम' या चित्रपटाद्वारे श्रीदेवी पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. तमीळ चित्रपट "थुनीवावन'मधून तिने बालकलाकर म्हणून प्रथम अभिनय केला.

त्यानंतर तिने अनेक बहुभाषी चित्रपटांत काम केले. "मॉम' हा तिचा 300 वा चित्रपट आहे. ती 50 वर्षे इंडस्ट्रीत आहे. तिचे पती आणि निर्माते बोनी कपूर हे तिचा हा चित्रपट 7 जुलैला प्रदर्शित करणार आहेत. कारण श्रीदेवीचा पहिला चित्रपट 7 जुलैलाच प्रदर्शित झाला होता.

श्रीदेवीची दक्षिणेतील प्रसिद्धी पाहून बोनी कपूर यांनी हा चित्रपट तमीळ, तेलुगू, मल्याळम आणि हिंदी असा चार भाषांमध्ये प्रदर्शित करण्याचे ठरवले. श्रीदेवीने साऊथमध्ये काम केल्यामुळे ती या चित्रपटासाठी चारही भाषांमध्ये चित्रपटाचे डबिंग करणार आहे.