'संघमित्रा' श्रुती हसन 

वृत्तसंस्था
सोमवार, 22 मे 2017

श्रुती हसन सध्या सुंदर सी. यांच्या "संघमित्रा' चित्रपटासाठी तयारी करीत आहे.

श्रुती हसन सध्या सुंदर सी. यांच्या "संघमित्रा' चित्रपटासाठी तयारी करीत आहे.

तिला सुंदर यांच्यासोबत काम करण्याविषयी विचारल्यावर ती म्हणाली, "मी कोणाचे काम पाहून त्यांच्याविषयी मत बनवत नाही किंवा कोणी मला कोणाबद्दल काही सांगितलं तरीही मी तसं करत नाही. "संघमित्रा' ही एका योद्धा स्त्रीची कथा आहे. ही व्यक्तिरेखा साकारण्यासाठी श्रुती सध्या लंडनमध्ये तलवारबाजीचे धडे गिरवत आहे. "संघमित्रा'चे पोस्टर कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये नुकतेच प्रदर्शित करण्यात आले.