भाभीजी बहुत फॅट है! श्वेता शिंदेवर ट्रोलिंग

टीम ई सकाळ
रविवार, 10 सप्टेंबर 2017

सोशल मिडीयाचे फायदे जसे आहेत, तसे त्याचे तोटेही असतात. ट्रोलिंग हा त्याचा मोठा तोटा मानला जातो. कोणत्याही कारणाने आॅनलाईन नेटकरी कलाकारावर तुटून पडतात. तशी वेळ आता भाभी जी घर पे है फेम श्वेता शिंदेवर आली आहे. पटेल की पंजाबी शादी या सिनेमात श्वेताने  मारो लाईन या नावाचं एक आयटम साॅंग केलं आहे. यात तिचं दिसणं आणि तिचा ड्रेसिंग सेन्स नेटकऱ्यांना आवडलेला नाही. 

मुंबई : सोशल मिडीयाचे फायदे जसे आहेत, तसे त्याचे तोटेही असतात. ट्रोलिंग हा त्याचा मोठा तोटा मानला जातो. कोणत्याही कारणाने आॅनलाईन नेटकरी कलाकारावर तुटून पडतात. तशी वेळ आता भाभी जी घर पे है फेम श्वेता शिंदेवर आली आहे. पटेल की पंजाबी शादी या सिनेमात श्वेताने  मारो लाईन या नावाचं एक आयटम साॅंग केलं आहे. यात तिचं दिसणं आणि तिचा ड्रेसिंग सेन्स नेटकऱ्यांना आवडलेला नाही. 

तिच्या या गाण्यावर श्वेता कशी प्रमाणापेक्षा जाड दिसतेय यावर बरंच ट्रोल झालं आहे. शिवाय जाड असण्याबद्दल हरकत नाही, पण निदान कपडे तरी कसे घालायला हवेत यावरही तिला सुनावण्यात आलं आहे. श्वेताकडून अधिकृत असं उत्तर मात्र अालेलं नाहीय. पण सिनेमाच्या टीमकडून श्वेताची पाठराखण करण्यात आली आहे. श्वेता काही या गाण्यासाठी जाड झालेली नाही. किंवा तिला तसे कपडे देण्यात तिचा काहीच दोष नाहीय. तिला सिनेमाचा दिग्दर्शक तशा सूचना देत असतो, असं सांगितलं आहे.