सिध्दार्थ आणि तृप्तीची नच बलियेमध्ये धूम

टीम ई सकाळ
गुरुवार, 25 मे 2017

'नच बलिये'च्या आठव्या पर्वात सिध्दार्थ जाधव आणि तृप्ती यांनी आता जोरदार मुसंडी मारली असून, आपले एकापेक्षा एक दमदार परफाॅर्मन्स द्यायला ही जोडी सज्ज झाली आहे. याचाच एक भाग म्हणून येत्या शनिवारी हे दोधे म्हैषासूर मर्दीनी हा अॅक्ट सादर करणार आहेत. 

मुंबई: 'नच बलिये'च्या आठव्या पर्वात सिध्दार्थ जाधव आणि तृप्ती यांनी आता जोरदार मुसंडी मारली असून, आपले एकापेक्षा एक दमदार परफाॅर्मन्स द्यायला ही जोडी सज्ज झाली आहे. याचाच एक भाग म्हणून येत्या शनिवारी हे दोधे म्हैषासूर मर्दीनी हा अॅक्ट सादर करणार आहेत. 

हा अॅक्ट सादर करण्यापूर्वी या दोघांनी एक सेल्फी काढला असून तो ई-सकाळसोबत शेअर केला आहे. यात दोघेही पौराणिक वेशभूषेत दिसत असून, त्यांनी नेमका काय अॅक्ट केला आहे त्यासाठी शनिवारपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. मिळालेल्या माहितीऩुसार हा अॅक्ट सर्वच परीक्षकांना कमालीचा आवडला असून सोनाक्षी सिन्हाने या दोघांचे विशेष कौतुक केले आहे.