लावणीपायी सोनालीने नाकारला.. मृण्मयीने स्वीकारला!

टीम ई सकाळ
सोमवार, 31 जुलै 2017

सध्या मराठीमध्ये बरेच मोठे सिनेमे बनताना दिसत आहेत. त्यात भर पडते आहे ती एेतिहासिक चित्रपटांची. सध्या अभिनेता  आणि आता दिग्दर्शक बनलेला दिग्पाल लांजेकर नवा सिनेमा घेऊन येत आहे, या चित्रपटाचे नाव आहे फरजंद.

मुंबई: सध्या मराठीमध्ये बरेच मोठे सिनेमे बनताना दिसत आहेत. त्यात भर पडते आहे ती एेतिहासिक चित्रपटांची. सध्या अभिनेता  आणि आता दिग्दर्शक बनलेला दिग्पाल लांजेकर नवा सिनेमा घेऊन येत आहे, या चित्रपटाचे नाव आहे फरजंद. हा चित्रपट शिवरायांच्या काळातील असून मराठी सिनसृष्टीतील अनेक मोठे दिग्गज कलाकार यात काम करत आहेत. विशेष बाब अशी की यात मृण्मयी देशपांडेही एका महत्वाच्या भूमिकेत आहे. ही भूमिका आधी अभिनेत्री अप्सरा सोनाली कुलकर्णी हिला देऊ केली होती, पण, त्यांनी ती नाकारल्याने ही भूमिका मृण्यचीच्या वाट्याला आली. 

मिळालेल्या माहितीनुसार सोनाली कुलकर्णी हीच या भूमिकेची पहिली निवड होती. परंतु चित्रपटातील या भूमिकेला एक लावणीनृत्यही करायचे होते. गेल्या अनेक महिन्यांपासून सोनाली लावणी करत नाही. या भूमिकेत लावणी असल्याचे कळताच, तिने ही भूमिका नाकरल्याचे कळते. परिणामी मृण्मयी देशपांडेची निवड भूमिकेसाठी झाली. या भूमिकेला तिनेही पुरेपूर न्याय दिल्याची चर्चा सेटवर होती. सोनालीने ठरलेल्या धोरणानुसार निर्णय घेतला हे खरे. पण त्यामुळे एक एेतिहासिक पट तिच्या हातून गेला. 

केवळ नृत्यांगना म्हणून ओळख न होता, एक अभिनेत्री म्हणूनही अस्तित्व दाखवण्यासाठी सोनालीने काही निर्णय घेतले. अर्थात, हेही कौतुकास्पद आहेच.