सोनम भेटली सुपरहिरोला

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 नोव्हेंबर 2016

मार्वल कॉमिक्‍स लहानपणी सगळ्यांनीच वाचली असतील. बॅटमॅन, सुपरमॅन, कॅटवूमन, स्पायडरमॅन हे आपले आवडते सुपरहिरो या कॉमिक्‍समधून आपल्याला भेटतात. नुकतीच सोनम कपूर एका सुपरहिरोला भेटली. तुम्ही म्हणाल ते कसं काय? सोनम अमेरिकेत होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर तेथील लोकांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहन द्यायला गेली होती. तिथे बेवर्ली हिल्स या ठिकाणी ती मार्वल या कॉमिक मॅगझीनच्या निर्मात्यांना भेटली. स्टेनली हे या कॉमिक मॅगझीनचे निर्माते. कॉमिक बूक लेखक, संपादक, प्रकाशक, निर्माता, टीव्ही होस्ट अशा विविध भूमिकांमध्ये ते आनंदाने वावरत असतात.

मार्वल कॉमिक्‍स लहानपणी सगळ्यांनीच वाचली असतील. बॅटमॅन, सुपरमॅन, कॅटवूमन, स्पायडरमॅन हे आपले आवडते सुपरहिरो या कॉमिक्‍समधून आपल्याला भेटतात. नुकतीच सोनम कपूर एका सुपरहिरोला भेटली. तुम्ही म्हणाल ते कसं काय? सोनम अमेरिकेत होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर तेथील लोकांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहन द्यायला गेली होती. तिथे बेवर्ली हिल्स या ठिकाणी ती मार्वल या कॉमिक मॅगझीनच्या निर्मात्यांना भेटली. स्टेनली हे या कॉमिक मॅगझीनचे निर्माते. कॉमिक बूक लेखक, संपादक, प्रकाशक, निर्माता, टीव्ही होस्ट अशा विविध भूमिकांमध्ये ते आनंदाने वावरत असतात. एवढा सगळा डोलारा ते एकटे सांभाळतात म्हणजे त्यांनाही सुपरहिरोच म्हणावं लागेल. या सुपरहिरोनेच स्पायडरमॅन, हल्क, फॅंटास्टिक ४, आयर्नमॅन, डेअरडेव्हिल, थॉर, एक्‍स मॅन हे सगळे सुपरहिरो आपल्या कल्पनाशक्तीने निर्माण केले आणि कॉमिक्‍सच्या माध्यमातून वाचकांच्या भेटीस आणले. सोनम कॅलिफोर्नियाच्या एका हॉटेलमध्ये थांबली असताना तिथे तिची स्टेन ली यांच्याशी भेट झाली आणि तिने हा क्षण लगेचच आपल्या कॅमेऱ्यात कैद केला.

टॅग्स

मनोरंजन

मुंबई : सनी लिओनी दरवेळी आपल्या नवनव्या गाण्यांनी चर्चेत असते, पण आता मात्र तिला कायदेशीर बडग्याला उत्तर द्यावे लागणार आहे. सोशल...

03.57 PM

मुंबई : सनी देओल हा नायक नंबर वनच्या स्पर्धेत कघीच नव्हता. तो यायचा आपला सिनेमा घेऊन आणि त्याचा ठरलेला प्रेक्षक तो सिनेमा पाहायचा...

03.39 PM

मुंबई : सध्या जॅकलिन फर्नांडिस जुडवा 2 च्या प्रमोशनमध्ये खूप व्यग्र आहे. सध्या अनेक माध्यमांना ती मुलाखती देत सुटली आहे. साहजिकच...

02.33 PM