'ई सकाळ'च्या 'एफबी लाईव्ह'मध्ये आज स्पृहा जोशी आणि गश्मीर महाजनी

टीम ई सकाळ
मंगळवार, 8 ऑगस्ट 2017

गेल्या काही दिवसांपासून स्पृहा जोशी आणि गश्मीर महाजनी सतत वेगवेगळ्या माध्यमांमधे बोलताना दिसतात. कारण त्यांचा नवा सिनेमा येतोय. सिनेमाचं नाव आहे, मला काहीच प्राॅब्लेम नाही. समीर विद्वांस दिग्दर्शित हा चित्रपट येतोय 11 आॅगस्टला. त्यानिमित्त हे दोन कलाकार ई सकाळच्या एफबी पेजवर लाईव्ह येणार आहेत. सोबत असेल दिग्दर्शक समीर विद्वांस. 

पुणे : गेल्या काही दिवसांपासून स्पृहा जोशी आणि गश्मीर महाजनी सतत वेगवेगळ्या माध्यमांमधे बोलताना दिसतात. कारण त्यांचा नवा सिनेमा येतोय. सिनेमाचं नाव आहे, मला काहीच प्राॅब्लेम नाही. समीर विद्वांस दिग्दर्शित हा चित्रपट येतोय 11 आॅगस्टला. त्यानिमित्त हे दोन कलाकार ई सकाळच्या एफबी पेजवर लाईव्ह येणार आहेत. सोबत असेल दिग्दर्शक समीर विद्वांस. 

मंगळवारी सांयकाळी 6 वाजता हे एफबी लाईव्ह ई सकाळच्या पेजवरून होईल. यात रसिकांना प्रश्नही पिचारता येतील. मला काहीच प्राॅब्लेम नाही हा समीर विद्वांसचा चौथा चित्रपट. त्यांनी यापूर्वी टाईमप्लीज, डबलसीट, वायझेड असे सिनेमे दिले आहेत. या सिनेमाबद्दलचे प्रश्न तुम्हीही थेट विचारू शकता. संध्याकाळी 6 च्या सुमारास या एफबी गप्पांना सुरूवात होईल.