सुबोध भावे आणि दिप्ती देवीच्या योगायोगाच्या गोष्टी

टीम इ सकाळ
मंगळवार, 27 जून 2017

एका नाटकाच्या आणि त्यानंतर एका मालिकेच्या निमित्ताने हे दोघं एकत्र काम करणार होते पण तो योग काही जुळून आला नाही. आता मात्र ‘कंडिशन्स अप्लाय– अटी लागू’ या आगामी सिनेमाच्या निमित्ताने सुबोध व दिप्ती चा एकत्र काम करण्याचा योग जुळून आला आहे. येत्या ७ जुलैला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

मुंबई : असं म्हणतात की, ‘लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात’ पण रुपेरी पडद्यावरच्या रेशीमगाठी जुळून यायला सुद्धा असाच योग जुळून यावा लागतो. एकमेकांना चांगले ओळखणाऱ्या कलाकारांना एकत्र काम करण्याची संधी मिळतेच असं नाही. अनेक वर्षे चांगली मैत्री असलेल्या अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री दिप्ती देवीच्या बाबतीतही असंच घडत होतं. एका नाटकाच्या आणि त्यानंतर एका मालिकेच्या निमित्ताने हे दोघं एकत्र काम करणार होते पण तो योग काही जुळून आला नाही. आता मात्र ‘कंडिशन्स अप्लाय– अटी लागू’ या आगामी सिनेमाच्या निमित्ताने सुबोध व दिप्ती चा एकत्र काम करण्याचा योग जुळून आला आहे. येत्या ७ जुलैला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

‘आम्हाला एकत्र काम करायचे होते पण तशी संधीच मिळत नव्हती. आता ‘कंडिशन्स अप्लायच्या निमित्ताने एकत्र काम करण्याची आमची इच्छा पूर्ण झाली असून चित्रपटातील आमची केमेस्ट्रीही छान जुळून आली आहे’, असं हे दोघं सांगतात. डॉ.संदेश म्हात्रे निर्मित व गिरीश मोहिते दिग्दर्शित ‘कंडिशन्स अप्लाय’ चित्रपटात सुबोध भावे, दिप्ती देवी, अतुल परचुरे, राधिका विद्यासागर, मिलिंद फाटक, राजन ताम्हाणे, अतिशा नाईक, डॉ. उत्कर्षा नाईक, विनीत शर्मा यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद लेखन संजय पवार यांचे आहेत. छायांकन कृष्णा सोरेन याचं असून संकलन निलेश गावंड यांचं आहे. संगीत अविनाश–विश्वजीत यांनी दिलं आहे. सचिन भोसले व अमोल साखरकर या चित्रपटाचे सहनिर्माते असून कार्यकारी निर्माते प्रसाद पांचाळ आहेत.