अनोखा "फादर्स डे' 

वृत्तसंस्था
सोमवार, 19 जून 2017

विक्रम फडणीस निर्मित आणि दिग्दर्शित "हृदयांतर' चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला. या ट्रेलरमधून चित्रपटातली मुख्य व्यक्तिरेखा शेखर जोशी यांच्याकडे कामाच्या व्यापामुळे आपल्या नित्या आणि नायशा या दोन मुलींसाठी वेळच नसतो, हे दिसलं.

मुंबईसारख्या मोठ्या शहरात राहणाऱ्या आणि आपल्या करिअरच्या मागे धावताना आपल्या मुलांना व्यवस्थित वेळ न देऊ शकणाऱ्या शेखर जोशींची कथा "हृदयांतर' चित्रपटात दाखवण्यात आली आहे.

शेखरची भूमिका साकारणारा अभिनेता सुबोध भावेशी या संदर्भात चर्चा केल्यावर त्याने सांगितलं, "काहीही म्हणा, पण या सिनेमाच्या निमित्ताने दोन गोड मुलींचा बाप बनण्याची माझी इच्छा पूर्ण झाली.

कोणीही पुन्हा पुन्हा त्यांच्या प्रेमात पडावं अशा या मुली आहेत. या दोन्ही मुली जेवढ्या लाघवी आहेत, तेवढ्याच समंजसही आहेत. त्यामुळे यांच्यासोबत काम करणं नक्कीच सुखावह होतं.' "फादर्स डे'च्या निमित्ताने सुबोधने नुकतीच त्याच्या दोन्ही ऑनस्क्रीन मुलींना ट्रीट दिली. त्या वेळी दोन्ही मुलींचं सुबोधशी असलेलं नातं किती जवळंच होतं, हे दिसत होतं.