..आणि डाॅ. काशिनाथ घाणेकर यांच्या भूमिकेत सुबोध भावे!

टीम ई सकाळ
सोमवार, 4 सप्टेंबर 2017

प्रख्यात लेखक अभिजीत देशपांडे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. हा त्यांचा पहिलाच प्रयत्न असून, सुबोधलाही या चित्रपटाची पटकथा आवडल्याचे कळते. सध्या सुबोध तुला कळणार नाही या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र असून हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तो या चित्रपटाच्या तयारीला लागणार आहे. 

पुणे: एक अत्यंत संवेदनशील अभिनेता म्हणून सुबोध भावेने आपले स्थान भक्कम केले आहे. बालगंधर्व, लोकमान्य टिळक अशा विविधांगी भूमिका साकारतानाच त्याने फुगे, ह्रदयांतर, कंडिशन्स अप्लाय असे सिनेमे करत आपण चाकोरीबद्ध अभिनेता नाही हे त्याने सिद्ध केले आहे. आता तमाम नाट्यप्रेमी रसिकांसाठी दंतकथा बनून राहिलेल्या नटवर्य काशिनाथ घाणेकर यांच्यावर बनणाऱ्या चित्रपटात सुबोध डाॅ. काशिनाथ घाणेकर यांची भूमिका साकारतो आहे. या चित्रपटाचे लेखन पूर्ण झाले असून आता याचे चित्रिकरण नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. 

प्रख्यात लेखक अभिजीत देशपांडे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. हा त्यांचा पहिलाच प्रयत्न असून, सुबोधलाही या चित्रपटाची पटकथा आवडल्याचे कळते. सध्या सुबोध तुला कळणार नाही या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र असून हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तो या चित्रपटाच्या तयारीला लागणार आहे. 

या चित्रपटाचे संपूर्ण चित्रिकरण सांगली, कोल्हापूर भागात होणार आहे. या चित्रपटासाठी सुबोध विशेष मेहनतही घेणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार सुबोध आपले वजन जवळपास 20 किलोंनी कमी करणार आहे.