सनीच्या 'ट्रिपी ट्रिपी'वर शौकिनांच्या उड्या

टीम ई सकाळ
शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

मुंबई : सनी लिओनी दरवेळी काय नवं करते याकडे तिच्या चाहत्यांचं लक्ष असतं. अलिकडे सनीचा आपला असा मोठा सिनेमा आला नसला, तरी ती अनेक गाण्यात दिसते आहे. काही महिन्यांपूर्वी ती रईसमध्ये एका गाण्यात दिसली होती. आता तिची चर्चा होती ती संजय दत्तच्या भूमी या चित्रपटातल्या आयटम साॅंगमुळे. तिचे हे गाणे आज रिलीज झाले आहे. या गाण्यावर शौकिनांच्या उड्या पडल्या असून काही मिनिटांत जवळपास 80 हजार व्ह्यूज या गाण्याला मिळाले आहेत. 

सनीचं हे गाणंही रोमॅंटिक असून, तिची नखरेल अदा या गाण्यातही पाहायला मिळणार आहे. काही दिवसांपूर्वीच सनीने मराठीत पदार्पण केलं आहे. कुठं कुठं जायाचं या जुन्या मराठी गाण्यावर ती थिरकली आहे. आता भूमी या चित्रपटात तिचा नवा अवतार दिसणार आहे. ओ सैय्या तेरा ट्रिपी ट्रिपी असे या गाण्याचे बोल असून, सनीचा नृत्याविष्कार यात पाहायला मिळेल.