'उडता पंजाब'विरुद्धची याचिका फेटाळली

वृत्तसंस्था
गुरुवार, 16 जून 2016

नवी दिल्ली - ‘उडता पंजाब‘ या चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला आव्हान देत पंजाबमधील एका स्वयंसेवी संस्थेने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली सर्वोच्च न्यायालयाने आज (गुरुवार) फेटाळून लावली.

पंजाबमधील मानवी हक्क जागरूकतेविषयी काम करणाऱ्या "ह्युमन राइटस्‌ अवेअरनेस असोसिएशन‘ नावाच्या संस्थेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. "उडता पंजाब‘मधून पंजाबची खराब प्रतिमा दाखविण्याचा प्रयत्न केल्याचे म्हणत या चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्याची मागणी याचिकेत केली होती. या संदर्भातील याचिका पंजाब आणि हरियाना उच्च न्यायालयात प्रलंबित असल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे. न्यायाधीश आदर्श कुमार गोएल आणि एल. नागेश्‍वरा राव यांच्या सुटीच्या खंडपीठाने या याचिकेवर सुनावणी केली. ‘अंमली पदार्थांचा विषय हा केवळ पंजाबपुरता मर्यादित नसून तो संपूर्ण देशात आहे. सेन्सॉर बोर्डाने किंवा पंजाब सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिलेले नाही‘, असे म्हणत न्यायालयाने याचिका फेटाळून लावली.