सुशांत साकारणार द ग्रेट खली?

बुधवार, 20 सप्टेंबर 2017

सुशांत सिंग रजपूतकडे एक गुणी अभिनेता म्हणून पाहिलं जातं. काय पो छे या चित्रपटापासून सुरूवात केलेल्या सुशांतने नंतर वळूनही पाहिले नाही. गेल्या वर्षी त्याच्या आलेल्या एमएस धोनीवरील चित्रपटाने तर शंभर कोटीचा कल्ला कमावला होता. त्यानंतर मात्र त्याने सतत वेगळ्या भूमिका साकारण्याचा प्रयत्न केला. आता सुशांत द ग्रेट खलीची भूमिका साकारणार अशी बातमी आहे. 

 

मुंबई : सुशांत सिंग रजपूतकडे एक गुणी अभिनेता म्हणून पाहिलं जातं. काय पो छे या चित्रपटापासून सुरूवात केलेल्या सुशांतने नंतर वळूनही पाहिले नाही. गेल्या वर्षी त्याच्या आलेल्या एमएस धोनीवरील चित्रपटाने तर शंभर कोटीचा कल्ला कमावला होता. त्यानंतर मात्र त्याने सतत वेगळ्या भूमिका साकारण्याचा प्रयत्न केला. आता सुशांत द ग्रेट खलीची भूमिका साकारणार अशी बातमी आहे. 

द ग्रेट खली हा कुस्तीपटू डब्ल्यूडब्ल्यूईमुळे लोकांना माहित झाला. मुळचा भारतीय असलेला खली आता अमेरिकेत असतो. त्याच्या कुस्तीमुळे तो माहित असला तरी त्याच्या व्यक्तिगत जीवनाबद्दल फारच कमी  लोकांना कल्पना आहे. त्याचा तो भाग पडद्यावर येण्यासाठी बरीच मेहनत घेतली जात आहे. मुळात खलीचं काम कोण करणार याकडे अनेकांच लक्ष होतं. काही वर्षांपूर्वी खलीसाठी आमीर खानच्या नावाची चर्चा होती. पण आता सुशांतसिंग रजपूतच्या नावाची चर्चा आहे. सुशांतने याावर अद्याप काहीही प्रतिक्रिया दिली नसली तरी त्याला पटकथा आवडल्याचं समजतं.