सोशल मीडियावर 'मुंबई पुणे मुंबई 3' ची चाहूल?

रविवार, 22 ऑक्टोबर 2017

गेल्या काही दिवसांपासून सिनेवर्तृळातील अनेक मंडळी या 3 आकड्याभोवती नवनवे खेळ खेळताना दिसत आहेत. मुक्ता बर्वेने नुकतंच ट्विट करताना सर्वात लोकप्रिय 3 अक्षरं असं सांगत ILU असं सांगितलं. तर स्वप्नील जोशीने हा संदर्भ देत LOL ही अक्षरं सांगितली. यावरून या दोघांच्या चाहत्यांना मुंबई पुणे मुंबई 3 या चित्रपटाची ही नांदी तर नव्हे असं वाटून गेलं. 

पुणे : सतीश राजवाडे दिग्दर्शित मुंबई पुणे मुंबई या चित्रपटाने चांगली लोकप्रियता मिळवली. या चित्रपटाचा विषय, त्याची मांडणी आणि या सिनेमात असलेली स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे यांची जोडी लोकांनी डोक्यावर घेतली. त्यानंतर सात वर्षांनी मुंबई पुणे मुंबईचा दुसरा भाग आला. आता या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची जुळवाजुळव पूर्ण झाली आहे. कारण मुक्तासह स्वप्नील यांनी 3 आकडा समोर ठेवून चित्रपटाचं कॅम्पेन सुरू केलं आहे. यात चित्रपटाचं नाव अद्याप नाहीय. पण या दोघांचा तिसऱा भाग असलेला चित्रपट हा एमपीएम 3 असणार अशी चर्चा आॅनलाईन विश्वात आहे. 

गेल्या काही दिवसांपासून सिनेवर्तृळातील अनेक मंडळी या 3 आकड्याभोवती नवनवे खेळ खेळताना दिसत आहेत. मुक्ता बर्वेने नुकतंच ट्विट करताना सर्वात लोकप्रिय 3 अक्षरं असं सांगत ILU असं सांगितलं. तर स्वप्नील जोशीने हा संदर्भ देत LOL ही अक्षरं सांगितली. यावरून या दोघांच्या चाहत्यांना मुंबई पुणे मुंबई 3 या चित्रपटाची ही नांदी तर नव्हे असं वाटून गेलं. 

मुंबई पुणे मुंबईनंतर आलेल्या मुंबई पुणे मुंबई 2.. लग्नाला यायचं हं मध्ये या जोडीचं लग्न दाखवण्यात आलं होतं. सोबत दोघांचे कुटुंबीय आणि नातेवाईकांचा गोतावळा होता. आता तिसरा भाग करतानाही ही मंडळी असणार यात शंका नाही. म्हणूनच प्रशांत दामले, विजय केंकरे आदी मंडळींनी 3 आकड्याभवती काही कमेंट केली तर वावगं वाटू नये. आता या तिसऱ्या भागाला लोक स्वीकारतात का हे पाहाणं रंजक ठरणार आहे. 

मुंबई पुणे मुंबई 2 मध्ये लग्न दाखवल्यानंतर आता पुढच्या भागात या जोडीचं बाळ बाळंतपण दिसणार की ही गोष्ट आणखी काही नवे वळण घेणार हे मात्र सांगायला अद्याप कोणी तयार नाही. हा चित्रपट 2018 मध्ये येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.