स्वरा शिकतेय तेलगू 

वृत्तसंस्था
सोमवार, 12 जून 2017

अभिनेत्री स्वरा भास्कर हिने "रांझना', "तनू वेड्‌स मनू', "नील बट्टे सन्नाटा', "अनारकली ऑफ आरा' या चित्रपटातून अभिनयाचे पॉवर हाऊस आहे हे दाखवून दिलंय.

आपल्या प्रत्येक भूमिकेसाठी ती काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करत असते. सध्या ती तेलुगू शिकतेय. तिने "बाहुबली- 2' हा चित्रपट तेलुगू भाषेत बघितला आणि तिला तो खूप आवडला आणि तिला तेलुगू फारसं येत नाही याचं दुःख झालं. त्यामुळेच तिने तेलुगू शिकायचं ठरवलं.

ती म्हणते, "माझे बाबा आंध्र प्रदेशचे आहेत; पण आम्ही दिल्लीला राहिल्यामुळे आमच्या घरात कधी ती भाषा बोललीच गेली नाही. त्यामुळे मला त्याचे अर्धवट ज्ञान आहे. याचे मला खूप वाईट वाटते. पण आता मी तेलुगू शिकणार आहे. मला आजपर्यंत कोणत्याही प्रादेशिक भाषीय चित्रपटासाटी विचारण्यात आलेले नाही. पण भाषा येत नाही म्हणून मी तो चित्रपट स्वीकारणार नाही असे होणार नाही. ती माझ्यासाठी एक संधी आणि चॅलेंज असेल.'