स्वरावर कौतुकाचा वर्षाव 

वृत्तसंस्था
सोमवार, 27 मार्च 2017

"अनारकली ऑफ आरा' या चित्रपटातील वैशिष्ट्यपूर्ण भूमिकेमुळे अभिनेत्री स्वरा भास्करवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. द्वयर्थी गाणे म्हणत प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचे काम करत असताना ही अनारकली पुरुषी मानसिकतेसमोर न झुकता त्याच्याशी लढा देते, असा या चित्रपटाचा विषय आहे. यातील सामाजिक दडपणाखाली न येता बदला घेणाऱ्या अनारकलीची भूमिका स्वराने रंगविली आहे. "अनारकली' समजून घेण्याची अद्यापही भारतीय समाजाची तितकीशी तयारी नसल्याचे तिचे मत आहे. चित्रपट पाहून "अनारकली'बाबत सहानुभूती वाटल्यास आपले काम चांगले झाले असे वाटेल, असे स्वराचे म्हणणे आहे.  