अभी के लिये बहन का आन्सर चलेगा? तापसीने दिले रोखठोक उत्तर

टीम ई सकाळ
बुधवार, 13 सप्टेंबर 2017

सिनेमाच्या प्रमोशनला कलाकार अनेक ठिकाणी फिरत असतात. अनेकदा व्यक्तिगत सहलीवर गेल्यानंतर तिथे ते फोटोशूटही करत असतात, पण बऱ्याचदा त्यांच्या चाहत्यांना किंवा मुद्दाम टोचून टोमणे मारणाऱ्यांना यामुळे आयतं कोलीत हातात मिळतं. काही महिन्यांपूर्वी फातिमा साना शेखने दुबईत बिकीनी घालून त्याचे फोटो इन्स्टावर टाकले होते. त्यानंतर आपल्या धर्माचे दाखले देत अनेकांनी तिच्यावर टीका केली होती. टीव्हीवर काम करणाऱ्यांना बऱ्याचदा असा अनुभव येतो. आता सध्या चर्चेत असलेल्या तापसी पन्नूलाही हा अनुभव आला. पण या धाडसी मुलीने गप्प न राहता त्या इसमाला त्याच्याच भाषेत तिरकस उत्तर दिलं. 

मुंबई :  सिनेमाच्या प्रमोशनला कलाकार अनेक ठिकाणी फिरत असतात. अनेकदा व्यक्तिगत सहलीवर गेल्यानंतर तिथे ते फोटोशूटही करत असतात, पण बऱ्याचदा त्यांच्या चाहत्यांना किंवा मुद्दाम टोचून टोमणे मारणाऱ्यांना यामुळे आयतं कोलीत हातात मिळतं. काही महिन्यांपूर्वी फातिमा साना शेखने दुबईत बिकीनी घालून त्याचे फोटो इन्स्टावर टाकले होते. त्यानंतर आपल्या धर्माचे दाखले देत अनेकांनी तिच्यावर टीका केली होती. टीव्हीवर काम करणाऱ्यांना बऱ्याचदा असा अनुभव येतो. आता सध्या चर्चेत असलेल्या तापसी पन्नूलाही हा अनुभव आला. पण या धाडसी मुलीने गप्प न राहता त्या इसमाला त्याच्याच भाषेत तिरकस उत्तर दिलं. 

तापसीने आज बिकिनी घातलेले दोन फोटो ट्विटरवर शेअर केले. त्यावर एकाने हे तरी कपडे का घातलेस. जे काही उरले सुरले आहेत ते ही काढून टाक. तुझ्या भावाला किती गर्व वाटला असेल हे फोटो बघून असा तिरकस टोमणा हाणला. 

सर्वसाधारणपणे अशा कमेंटना दुर्लक्ष केलं जाते. पण तसं न करता तापसीने या इसमाला तडक लगेच उत्तर दिलं. त्यात त्याचा कोणताही अपमान न करता, आपल्याला भाऊ असता तर आपण हे नक्की केलं असतं. पण आत्तापुरतं या बहिणीचं उत्तर तुम्हाला चालेल का असा प्रतिप्रश्न केला आहे. 

ट्विटरवरची ही जुगलबंदी चांगलीच रंगली. पण तापसीने पुन्हा एकदा आपण कुणाला बांधिल नसल्याचे दाखवून दिलं आहे.